Virat Kohli Anushka Sharma
Virat Kohli Anushka Sharma  esakal
मनोरंजन

Virat Kohli : 'अनुष्का सर' म्हणताच, विराटचा पडला चेहरा!

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli Anushka Sharma royal challengers dinner : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत असतो. त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का ही देखील चाहत्यांच्या कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असते. सध्या सोशल मीडियावर विराट-अनुष्काचे फोटो व्हायरल झाले असून त्यामध्ये पापाराझ्झींनी विराटला डावलल्याचे दिसून आले आहे.

विरुष्का या नावानं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या विराट अनुष्काची सोशल मीडियावर होणारी चर्चा चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा विषय असतो. मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून त्या दोघांकडे पाहिले जाते. त्या दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. आताही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलेले त्या सेलिब्रेटींचे फोटो चाहत्यांच्या लाईक्सचा विषय आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

रॉयल चँलेजर्सच्या वतीनं आय़ोजित करण्यात आलेल्या त्या डिनर पार्टीमध्ये विराट अनुष्काचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावेळी फोटोग्राफर्सनं जेव्हा विराट ऐवजी अनुष्कालाच डिमांड दिल्यानं चाहत्यांची निराशा झाली आहे. त्या व्हिडिओमध्ये काही फोटोग्राफर्सनं अनुष्का सर म्हणून अनुष्काला हाक मारत फोटोसाठी पोझ देण्याची विनंती केली होती. त्यावेळी विराटच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते.

यापूर्वी देखील हे दोन्ही सेलिब्रेटी वेगवेगळ्या पार्ट्यांमधून चाहत्यांसमोर आले आहेत. त्यांचे फोटो पाहत त्यावर कमेंट करणे हा नेटकऱ्यांचा आवडीचा विषय असतो. काहीवेळेला ते दोघे ट्रोलही झाले आहे. मात्र ट्रोलर्सला जशास तसे उत्तर देण्यात अनुष्कादेखील नेहमीच पुढे असते. खासकरुन त्यांच्या मुलीचे वामिकाचे फोटो पापाराझ्झींनी काढल्यास तिला येणारा राग सगळ्यांना ठाऊक आहे.

पापाराझ्झींनी अनुष्काला अनुष्का सर म्हटल्यानं विराटनं गंमतीनं त्याच पापाराझ्झींना आता मला विराट मॅम म्हण..असे सांगत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT