मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल अनेकदा इंटरनेट सेंसेशन झाल्याचं समोर येतं. सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या जोडप्यांपैकी ते आहेत. शिवाय त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय नेटकऱ्यांना अनेकदा आला आहे. विराटचं त्याची पत्नी अनुष्कावर किती प्रेम आहे हे त्याच्या नव्य़ा इन्स्टाग्राम पोस्टवरुन लक्षात येत आहे.
या फोटोमध्ये विराट एका नदीकिनारी निवांत बसलेला दिसत आहे. विशेष म्हणजे विराटने चक्क अनुष्का नावाच्या पहिल्य़ा अक्षराचं टि-शर्ट घातलं आहे. 'A' या अक्षरासोबत एक हृदयदेखील दिसत आहे. विराटने या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, ''तो क्षण कैद झाला आहे. फोटो क्रेडिट - अनुष्का शर्मा".
या फोटोला नेटकऱ्यांनी कमेंटसह भरभरून प्रेम दिलय. हे जोडपं म्हणजे 'कपल गोल' असल्याचं चाहत्यांचं मत आहे. विराटचा हा फोटो सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी त्यांच्या वेकेशनचे फोटो अपलोड केले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.