Virat Kohli ready to work in Bollywood movie actor krk esakal
मनोरंजन

Virat Kohli : किंग कोहली करणार बॉलिवूडमध्ये काम? प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा!

विराटनं यापूर्वी वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्याच्या बॉलीवूड डेब्युविषयीची चर्चा रंगलेली आहे.

युगंधर ताजणे

Virat Kohli ready to work in Bollywood movie actor krk : भारतीय क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध फलंदाज विराट कोहली हा सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. केवळ भारतच नाहीतर जगभरातील प्रभावशाली फलंदाजामधील सर्वाधिक लोकप्रिय फलंदाज म्हणून विराटचे नाव घेतले जाते. सोशल मीडियावर विराटविषयीची एका बातमी व्हायरल होताना दिसते आहे.

विराटनं यापूर्वी वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्याच्या बॉलीवूड डेब्युविषयीची चर्चा रंगलेली आहे. विराटच्या अगोदर भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी चित्रपटांमध्ये कॅमिओ केले आहेत. त्यामध्ये सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी यांचे नाव घेता येईल. त्यानंतर आता विराटचे नाव घेतले जात आहे. सचिन, धोनी, प्रवीण तांबे, सौरभ गांगुली खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती केली गेली आहे.

Also Read - What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग ८३ मध्ये साकारलेली कपिल देव यांची भूमिका प्रेक्षकांच्या कौतूकाचा विषय होता. त्यानंतर वेगवेगळ्या खेळाडूंनी त्यांच्या आयुष्यावरील बायोपिकची घोषणाही केली होती. आता विराट बॉलीवूडपटाच्या एका सिक्वेलमध्ये काम करताना दिसणार असल्याचे अभिनेता केआरकेनं सांगितले आहे. त्यानं असा खुलासा केला आहे की, येत्या काळात विराट हा बॉलीवूडपटामध्ये काम करणार असल्याची शक्यता आहे.

विराटनं जाहिरातीमधून प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. सध्या तो भारतातील सर्वाधिक ब्रँडसची जाहिरात करणारा खेळाडू आहे. इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचे नाव आहे. अशावेळी त्याची सेकंड इनिंग ही बॉलीवूडच्या त्या सिक्वेलपटातून सुरु होणार असल्याचे भाकित केआरकेनं केलं आहे. केआरकेनं त्याला आपल्या देशद्रोही २ मध्ये कास्ट करण्याचा विचार करतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT