Virender Sehwag sarcastic comment on adipurush movie  SAKAL
मनोरंजन

Adipurush Virender Sehwag: सगळ्यांचं झालं आता विरु पाजीनं आदिपुरुषला सुनावलं... एका वाक्यात विषय संपवला

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने आदिपुरुष वर मौन सोडलंय.

Devendra Jadhav

adipurush movie comment by virendra sehwag news: आदिपुरुष सिनेमा प्रेक्षकांना आवडला नाही. ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांनी सिनेमावर सडकून टीका केली. प्रेक्षक, राजकारणी, समीक्षक अशा अनेकांनी सिनेमावर नाराजीची प्रतिक्रिया दिलीय.

सिनेमातले VFX, डायलॉग अशा अनेक गोष्टींवर जाणकारांनी मतं दिली आहेत. आता या सगळ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने मौन सोडलंय.

(Virender Sehwag sarcastic comment on adipurush movie)

वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर एक वाक्य टाकलंय आणि एका वाक्यात विषय संपवलाय. वीरू पाजी लिहितो.. आदिपुरुष पाहून कळलं कि.. कटप्पाने बाहुबलीला का मारलं होतं? एकूणच वीरू पाजीने एका वाक्यातच आदिपुरुष बद्दल कमेंट केलीय.

वीरेंद्रने प्रभासच्या बाहुबलीचा संदर्भ देऊन उपहासात्मक कमेंट केलीय. वीरू पाजीची हि कमेंट सध्या चांगलीच व्हायरल झालीय.

आदिपुरुष बद्दल थिएटर मालकांची नाराजी

आदिपुरुष सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आदिपुरुष सिनेमाला अनेक वादाला सामोरं जावं लागलं. आदिपुरुष रिलिजआधी चांगली कमाई करेल अशी सर्वांना खात्री होती.

पण चित्र पालटलं आणि आदिपुरुषला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. याचा फटका थिएटर मालकांना बसलाय. थिएटर मालकांनी आता मनातली घुसमट बाहेर काढायला सुरुवात केलीय.

आदिपुरुषच्या निर्मात्यांना तुरुंगात टाका

नुकतंच माहीम मधील लोकप्रिय गैटी गॅलॅक्सी थिएटर मालकांची प्रतिक्रिया समोर आलीय. यावेळी थिएटर मालकांनी सगळा राग काढलेला दिसतोय.

मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरचे मालक मनोज देसाई यांनी याविषयी विधान केलंय, 'आदिपुरुष' निर्मात्यांना तुरुंगात टाकले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, "चित्रपटात ज्या प्रकारे भगवान हनुमान आणि रावणाचे प्रदर्शन केले आहे ते अजिबात पटत नाही. क्रिती सेनन सीता कशी असू शकते?" असा सवाल त्यांनी विचारलाय. आता आदिपुरुष नंतर प्रभासचा Project K सिनेमा २०२४ ला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT