Vivek Agnihotri vs Aamir Khan
Vivek Agnihotri vs Aamir Khan  esakal
मनोरंजन

Vivek Agnihotri: 'मुर्ख आमिर'! जाहिरातीवरुन विवेक अग्निहोत्रींचा संताप

सकाळ डिजिटल टीम

Aamir Khan Vs Vivek Agnihotri: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता तो त्याच्या एका जाहिरातीवरुन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे. ती जाहिरात व्हायरल होताच सोशल मीडियावरुन त्याला ट्रोल करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी आमिरला धारेवर धरले आहे. बॉलीवूडचे प्रख्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आमिरवर संतापून प्रतिक्रिया दिली आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमिर हा त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. तो त्याच्या लाल सिंग चढ्ढामुळे चर्चेत आला होता. आता त्याच्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. अग्निहोत्री हे आमिर खानच्या नव्या जाहिरातीवरुन नाराज झाले आहेत. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, काहीही बोलत सुटायचं, आणि मग नंतर म्हणायचं की, हिंदू मला ट्रोल करतात. मुर्ख नाहीतर...असं आमिरच नाव न घेता त्यांनी त्याच्या जाहिरातीवर भाष्य केले आहे. मात्र नेटकऱ्यांना अग्निहोत्री यांचा बोलण्याचा रोख कुणाकडे आहे हे वेगळं सांगावं लागलेलं नाही.

* काय आहे ती जाहिरात...

आमिर त्या जाहिरातीमध्ये एका घरजावयाच्या भूमिकेत आहे. त्याच्यासोबत कियारा अडवाणी आहे. सामान्यत लग्न झाल्यानंतर मुलगी पतीच्या घरी येते. येथे मुलगा पत्नीच्या घरी जातो. त्याचे कारण म्हणजे त्याला पत्नीच्या आजारी वडिलांची जबाबदारी घ्यायची आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

एका युझर्सनं कमेंट दिली आहे की, मी या बँकेत एफडी केली होती आता ती बंद करणार आहे. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, दरवेळी आमच्या भावनांना का दुखावले जाते. असं काही दुसऱ्या धर्मांबाबत का केले जात नाही. याशिवाय अनेकांनी यावेळी अग्निहोत्री यांच्या ट्विटचे समर्थन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT