Vivek Agnihotri daughter mallika orange bikini pics viral after his secular comment on pathaan. Google
मनोरंजन

Pathaan च्या विरोधात बोलणं अग्निहोत्रींना पडलं महाग..व्हायरल झाले मुलीचे भगव्या बिकिनीतील फोटो

विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट करत 'पठाण' सिनेमा आणि त्यातील 'बेशरम रंग' गाण्याची खिल्ली उडवली होती.

प्रणाली मोरे

Vivek Agnihotri: 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वीच 'पठाण' सिनेमावर कमेंट केली होती आणि खळबळ उडवून दिली होती..पण आता लोकांनी अग्निहोत्रींवर थेट निशाणा साधला आहे. विवेक अग्निहोत्रींना 'पठाण'वर कमेंट करणं यामुळे चांगलेच महागात पडले आहे.

काही नेटकऱ्यांनी त्यांची मुलगी मल्लिकाचे भगव्या रंगाच्या बिकिनीतील फोटो शोधून काढून व्हायरल केले आहेत.नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्री यांना खूप सुनावलं देखील आहे.

एवढंच नाही तर काही नेटकऱ्यांनी त्यांच्या जुन्या वादग्रस्त सिनेमातील क्लीप देखील व्हायरल केल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या 'हेट स्टोरी' सिनेमाची आठवण करुन दिली आहे..ज्यात इंटिमेट आणि बोल्ड सीन्सचा भरणा आहे.(Vivek Agnihotri daughter mallika orange bikini pics viral after his secular comment on pathaan.)

विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वीच 'पठाण' ला नावं ठेवताना एक ट्वीट केलं होतं ...ते म्हणाले होते,''तुम्ही सेक्युलर असाल तर मी ट्वीट केलेला हा व्हिडीओ पाहू नका''. एवढंच नाही तर त्यांनी 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्याला नावं ठेवताना एका छोट्या मुलीचा व्हिडीओ सोबत ट्वीट केला होता. व्हिडीओमध्ये मुलगी या गाण्याला अश्लील गोष्टींना प्रवृत्त करणारं गाणं म्हणून संबोधतना दिसत आहे. अग्निहोत्रींच्या याच ट्वीटवर लोक भडकलेयत. आणि लोकांनी विवेक अग्निहोत्रींच्या मुलीचे भगव्या बिकिनीतील फोटो व्हायरल केले आहेत.

या फोटोत मल्लिका अग्निहोत्रीनं भगव्या रंगाची बिकिनी घातलेली आहे,ज्या रंगाची बिकिनी दीपिकानं बेशरम रंग गाण्यात घातली आहे. यालाचा लक्ष्य करुन आता नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्रींची खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्यानं विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचे बिकिनीतील फोटो शेअर करत लिहिलं आहे की विवेक अग्निहोत्रींना अभिनेत्रीच्या बिकिनीवर आक्षेप आहे पण जरा पहा त्यांच्या स्वतःच्या मुलीनं कुठल्या रंगाची बिकिनी घातलीय.

आता सोशल मीडियावर नेटकरी अग्निहोत्रींची शाळा घेताना दिसत आहेत. एकानं लिहिलं आहे, ''आता हा विवेक शाहरुखला कधी ट्रोल करणार नाही. त्याच्या स्वतःच्या मुलीला त्याच्या या फटकळ बोलण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे''.

Mallika Agnihotri Photo viral-orange bikini photo

विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचे भगव्या रंगाच्या बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. नेटकरी त्यांच्यावर आगपखड करताना दिसत आहेत. एकानं तर चक्क लिहिलंय की, ''लोकांना शहाणपणा नंतर शिकवा आधी आपल्या घराकडे लक्ष द्या''. आता या वादा दरम्यान अग्निहोत्री यांच्या मुलीनं आपलं इन्स्टा अकाउंट प्रायव्हेट ठेवलं आहे. तर अग्निहोत्रींची मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT