Vivek Agnihotri announcing next film Parva esakal
मनोरंजन

Vivek Agnihotri : ठरलं तर मग, पुढचा चित्रपट 'महाभारता'वर! काश्मिर फाईल्सच्या अग्निहोत्रींची घोषणा

द काश्मिर फाईल्समुळे अग्निहोत्री चर्चेत आले होते. यापूर्वीच्या त्यांच्या चित्रपटांनी लोकप्रियता मिळवली होती.

युगंधर ताजणे

Vivek Agnihotri announcing next film Parva : बॉलीवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट म्हणून द काश्मिर फाईल्सचे नाव घेतले जाते. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. जेवढी टीका वाट्याला आली तितकीच प्रशंसाही या चित्रपटाला मिळाली होती.

द काश्मिर फाईल्समुळे अग्निहोत्री चर्चेत आले होते. यापूर्वीच्या त्यांच्या चित्रपटांनी लोकप्रियता मिळवली होती. त्यात द ताश्कंद फाईल्स आणि बुद्धा इन ट्रॅफिक जॅम नावाच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांनी पसंद केले होते. या सगळ्यात अग्निहोत्री यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सीन वॉर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. नाना पाटेकरांसोबत द व्हॅक्सीन वॉर केल्यानंतर अग्निहोत्री यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. आता अग्निहोत्री यांच्या नव्या चित्रपटाविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे.

प्रसिद्ध कन्नड लेखक साहित्य अकादमी विजेते साहित्यकार एस एल भैरप्पा यांच्या पर्व नावाच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. त्यात दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी पुढाकार घेतला आहे. पर्व ही कादंबरी महाभारत आणि महाभारतातील व्यक्तिरेखेवर आधारित आहे. त्यामुळे अग्निहोत्रींनी येत्या काळात महाभारतावर चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निहोत्री हे बंगळुरुमध्ये याविषयी अधिकृतपणे घोषणा करणार आहे. यावेळी निर्मात्या आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, सह लेखक प्रकाश बेलावाडी आणि कादंबरीचे लेखक एस एल भैरप्पा देखील उपस्थित राहणार आहेत. पर्व या कादंबरीमध्ये महाभारतातील व्यक्तिरेखा यांचे वेगळ्या पैलुमधून सादरीकरण करण्यात आले आहे. वाचकप्रिय कादंबरी म्हणून पर्वचे साहित्यसृष्टीत नाव घेतले जाते.

अग्निहोत्री यांची ओळख एक प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून केली जाते. त्यांच्या आतापर्यतच्या कलाकृती या नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यावरुन मोठा वादही झाला आहे. मात्र आपल्या जे वाटते ते ठामपणे सांगण्याचा आणि त्यावरुन भाष्य करण्याचा अधिकार अग्निहोत्री यांनी चोखपणे बजावला आहे. हे त्यांच्या चित्रपटांवरुन दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT