Vivek Agnihotri On Jawan: Esakal
मनोरंजन

Vivek Agnihotri On Jawan: शाहरुखच्या जवानची क्रेझ पाहताच विवेक अग्निहोत्रींचे सुर बदलले! केला कौतुकाचा वर्षाव

Vaishali Patil

Vivek Agnihotri On Jawan: काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गेल्या वर्षी सर्वाधिक चर्चेतील आणि वादग्रस्त चित्रपट म्हणून ज्याकडे पाहिले गेल्या त्या द काश्मीर फाईल्सला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर विवेक अग्निहोत्री हे जरा जास्तच चर्चेत आले. ते नेहमी काहीही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्याचबरोबर ते बॉलिवूड कलाकरांवर देखील निशाणा साधत असतात.

अशातच काही दिवसांपुर्वी त्यांनी शाहरुखच्या जवान चित्रपटाचीही खिल्ली उडवली होती. त्यांनी 'जवान' चित्रपटासंदर्भात एक मीम सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विवेकचा सूर अचानक बदलला. अलीकडेच 'जवान'चा ट्रेलर रिलिज झाला आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर फक्त जवानचीच चर्चा होती. त्यातच आता विवेक यांनी देखील या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. इतकच नाही तर या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याची इच्छा देखील त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

त्याच झालं असं की काही वेळापुर्वी विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर चाहत्यांसोबत 'आस्क मी एनीथिंग' सेशनचे घेतले होते. या सेशनमध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याला खुप सारे प्रश्न विचारले तर अग्नीहोत्री यांनी देखील चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले होते.

तर यातच एका चाहत्यांने त्यांना विचारले की, 'तुम्हाला 'जवान'चा ट्रेलर कसा वाटला?'

यावर अग्नीहोत्री यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले आहे. त्याला उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणाला, 'अद्भुत, माइंड ब्लोइंग.. तो ब्लॉकबस्टर असेल.' त्यांनी शाहरुख खानचा जवान हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचं लिहिलं आहे.

तर लगेचच दुसऱ्याने त्यांना विचारले की तुम्ही जवान पहाणार का त्याला विचारले की, 'तुम्ही 'जवान' पाहणार का?' यावर विवेक म्हणाले की, 'ते फर्स्ट डे...पण तिकीट कुठं आहेत यार? शाहरुखला सांगा की प्लिज तिकीट मिळवून दे.'

Vivek Agnihotri On Jawan

त्यामुळे आता जवानचा प्रभाव शाहरुखच्या पठाणवर टीका करणाऱ्या विवेक अग्नीहोत्री यांच्यावर देखील असल्याच्या चर्चा आहेत. ते देखील शाहरुखच्या जवानचे फॅन झाल्याचे बोलले जात आहे.

शाहरुखच्या 'जवान' बद्दल बोलायचं झाल्यास 7 सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाची अॅडवान्स बुकिंग बंपर झाली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाची 2.71 लाख तिकिटे विकली गेली आहेत.

शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. त्यामुळे आता शाहरुखचा जवान त्याच्या पठाणचा आणि सनी देओलच्या गदरचा रेकॉर्ड मोडू शकतो का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकलची सेवा कोलमडली! तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्या खोळंबल्या, प्रवाशांना मनस्ताप

FDA Action: फळे-भाज्यांवर रसायनांचा खेळखंडोबा थांबणार! ग्राहकांच्या तब्येतीशी खेळ करणाऱ्यांना राज्य सरकार धडा शिकवणार, नवा नियम काय?

Nashik News : सैनिक, लिपिक, शेफसह विविध पदांसाठी १ डिसेंबरपर्यंत भरती प्रक्रिया; नाशिक रोड रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी

Kolhapur News: शिरोळ तालुक्यातील तडजोडी, कट्टर विरोधक नेत्यांचे ‘गळ्यात गळे, ‘गृहीत’ धरण्याने कार्यकर्त्यांची कोंडी

Sinner Politics : सिन्नर: सोमठाणे गटात काका-पुतणीत लढत रंगणार; मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वर्चस्वाला बंधू भारत कोकाटेंचे भाजपमधून आव्हान

SCROLL FOR NEXT