Vivek Agnihotri Angry On Adipurush Makers esakal
मनोरंजन

Vivek Agnihotri : 'रात्री दारु प्यायची, सकाळी देवाची भूमिका करायची!' असं कसं चालेल?

यासगळ्यात काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा आदिपुरुषच्या मेकर्स आणि अभिनेत्यांवर तोफ डागली आहे.

युगंधर ताजणे

Vivek Agnihotri Angry On Adipurush Makers : काश्मिर फाईल्समधून वेगळी ओळख तयार केलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे नेहमीच त्यांच्या परखड वक्तव्यासाठी चर्चेत असतात. आपल्याला एखाद्या कलाकाराविषयी, कलाकृतीबद्दल जे काही वाटते ते ठामपणे सांगण्याची हिंमत अग्निहोत्री यांनी यापूर्वी देखील दाखवून दिली आहे. आता पुन्हा अग्निहोत्री त्यांच्या आक्रमक वक्तव्याबद्दल चर्चेत आले आहेत.

गेल्या महिन्यांत प्रदर्शित झालेल्या ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. भलेही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली असेल पण त्यावरुन मोठा वादही झाल्याचे दिसून आले. रामायणाची मोडतोड करुन भावना दुखावल्याचा आरोप नेटकऱ्यांनी आदिपुरुषवर केला होता. त्यानंतर विविध राजकीय पक्ष, धार्मिक संघटना यांनी देखील आदिपुरुषवर टीका केली होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

यासगळ्यात काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा आदिपुरुषच्या मेकर्स आणि अभिनेत्यांवर तोफ डागली आहे. यापूर्वी देखील अग्निहोत्री यांनी आदिपुरुषमधील कलाकार प्रभास, सैफ अली खान यांच्यावर निशाणा साधला होता. जेव्हा मेकर्स अशाप्रकारचे चित्रपट तयार करतात तेव्हा ते कोणत्याही प्रकारचा रिसर्च करत नाही. त्यामुळे गोष्टी बिघडतात.

जर तुम्ही कोणत्याही धार्मिक विषयावर चित्रपट तयार करत असाल तर तुम्हाला शंभर टक्के पूर्ण प्रयत्नानं संशोधन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही रात्र दारु पिणार आणि सकाळी उठून देवाची भूमिका करणार तर लोकं तुमच्यावर कसं विश्वास ठेवणार. टाईम्स ऑफ इंडियाशी बातचीत करताना अग्निहोत्री यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

तुम्ही चित्रपट तयार करण्यासाठी धार्मिक विषयांची निवड करता. ज्यात अनेकांची आस्था आहे. पण त्यात तुमची देखील श्रद्धा असायला हवी. नाहीतर तुम्हाला एखाद्या इतिहासकारासारखी माहिती देखील हवी. दुर्देवानं भारतातील फिल्ममेकर अशा कोणत्याही प्रकारचे कष्ट घ्यायला मागत नाही. अशी खंत अग्निहोत्री यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT