Volodymyr Zelenskyy
Volodymyr Zelenskyy 
मनोरंजन

Volodymyr Zelenskyy: राष्ट्रपती होण्यापूर्वी चित्रपटांत होते अभिनेते

सकाळ डिजिटल टीम

Russia And Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धानं आता सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या दोन्ही देशांमध्ये (Ukraine) युद्धाला सुरुवात झाले आहे. यात रशियावर सगळ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेननं शांततेची भूमिका घेतली असून (Entertainment) अजूनही आम्ही चर्चेला बसण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासगळ्यात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या बाजूनं सोशल मीडियावर सहानुभूती असल्याचे दिसून आले आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्याबाबतील काही वेगळ्या गोष्टीही यानिमित्तानं समोर आल्या आहेत. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी चित्रपटात भूमिका केली होती. अशी माहिती आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मुख्यतः रशियन भाषेतील निर्मितीमध्ये काम केले. I, You, He, She हा त्यांचा पहिला युक्रेनियन भाषेतील चित्रपट होता. या चित्रपटाची स्क्रिप्ट प्रथम युक्रेनियन भाषेत होती.

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या तणावाचे वातावरण असताना सोशल मीडियावर युक्रेन, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांविषयीच्या हटक्या गोष्टी व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याविषयी नेटकऱ्यांना, वाचकांना माहिती आहे. ते कोण होते, त्यांचा इतिहास याबाबत बऱ्यापैकी माहिती उपलब्ध आहे. मात्र युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांविषयी बरीच माहिती नेटकऱ्यांना माहिती नाही. ती म्हणजे ते अभिनेते होते. त्यांनी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. युद्धाच्या निमित्तानं नेटकऱ्यांनी या मुद्दयाकडे लक्ष वेधले आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचे नाव वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) आहे. 2019 मध्ये त्यांनी युक्रेनचे अध्यक्षपद स्वीकारले. व्होलोडिमिर झेलेन्स्की राष्ट्रपती होण्यापूर्वी अभिनेता आणि विनोदी कलाकार होते. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी स्थानिक विनोदी स्पर्धेत भाग घेतला होता.

व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याविषयी आणखी माहिती सांगायची झाल्यास, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना प्रत्येकजण ओळखतो. पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत आणि त्यांनी याआधी काय केले हे बऱ्याच जणांना माहिती नाही. ते वयाच्या 17 व्या वर्षी, वोलोडिमिर झेलेन्स्की केव्हीएन नावाच्या स्थानिक विनोदी स्पर्धेच्या संघात सामील झाले होते. त्यांना लवकरच युक्रेनच्या झापोरिझिया-क्रिवी रिह-ट्रान्झिट संघात कामगिरी करण्याची संधी मिळाली. या संघाने KVN च्या मेजर लीगमध्ये कामगिरी केली आणि 1997 मध्ये विजय पण मिळाला. त्याच वर्षी वोलोडिमिर झेलेन्स्कीने क्वार्टल 95 नावाचा संघ तयार केला. 1998 ते 2003 पर्यंत या संघाने मेजर लीगमध्ये भाग घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT