Waheeda Rahman Dada Saheb Phalke Award 2023: Esakal
मनोरंजन

Waheeda Rahman: देवानंदचं बड्डे गिफ्ट! फाळके पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर वहिदा यांची पहिली प्रतिक्रिया

Waheeda Rahman Dada Saheb Phalke Award 2023: बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Vaishali Patil

Waheeda Rehman Dada Saheb Phalke Award 2023: भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 'गाइड', 'प्यासा', 'साहेब बीबी और गुलाम', 'दिल्ली-6', 'कागज के फूल' यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. जवळपास सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे.

त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर केली आहे. त्यानंतर वहिदा यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. तर आता वहिदा यांनी या बातमीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

वहिदा रेहमान यांनी पीटीआयशी याबद्दल बोलतांना आनंद व्यक्त केला. याविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की, 'आज ही घोषणा होणं माझ्यासाठी दुहेरी आनंदाची गोष्ट आहे.. कारण आज देव आनंद यांचा वाढदिवस आहे, 'त्याला भेटवस्तू द्यायची होती, मला मिळाली..'

वहीदा यांनी आपल्या करिअरमध्ये प्रत्येक सुपरस्टारसोबत काम केले होते. 'कागज के फूल', 'चौधवी का चाँद', 'साहेब बीवी और गुलाम', 'गाइड', 'खामोशी' हे त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडिने बघतात.

रेश्मा और शेरा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

आता इंडस्ट्रीत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लाखो मने जिंकणाऱ्या वहिदा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

RCB vs GT Qualifier 1 : कागिसो रबाडाने इतिहास घडवला! मोहम्मद शमीचा विक्रम मोडला, शुभमन गिलच्या अफलातून झेलची हवा... Video

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनेच्या 'या' मागण्या सरकार का स्वीकारत नाही? OPS बाबत महत्त्वाची माहिती...

School Notebook Price Hike : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना झटका! वह्या, पुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ; जून महिना उजाडण्यापूर्वीच बजेट कोलमडणार

सूर्यकुमार यादव IPL 2026 नंतर आता, युगांडा संघाविरुद्ध ट्वेंटी-२० सामना खेळणार! मुंबईत ही मॅच कधी व केव्हा होणार?

SCROLL FOR NEXT