Waheeda Rehman Asha Parekh and Helen  instagram
मनोरंजन

अजुनही यौवनात मी! ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींचा 'व्हेकेशन मोड ऑन'

वहिदा रेहमान, आशा पारेखा आणि हेलन यांचा फोटो व्हायरल

स्वाती वेमूल

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री वहिदा रेहमान Waheeda Rehman, आशा पारेख Asha Parekh आणि हेलन Helen अंदमान आणि निकोबारमध्ये Andaman and Nicobar सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. या तिघींच्या 'व्हेकेशन'चे फोटो बॉलिवूड निर्माते तनुज गर्ग यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये वहिदा, आशा आणि हेलन या एका स्पीडबोटवर असल्याचं पाहायला मिळत आहे. वहिदा यांचा ड्राइव्हर सीटवर बसलेलाही एक फोटो आहे तर दुसऱ्या फोटोत त्या आशा पारेख यांच्यासोबत गप्पा मारण्यात मग्न झालेल्या दिसत आहेत. (Waheeda Rehman Asha Parekh and Helen are on a summer vacation in Andamans)

या तीन अभिनेत्रींचा फोटो पोस्ट करत तनुज यांनी लिहिलं, 'पहिला फोटो १०.०५.२१. जर 'दिल चाहता है' हा चित्रपट पुन्हा एकदा दिग्गज कलाकारांसोबत बनवायचं असेल, तर तो या तिघींना सोबत घेऊन असावा.. वहिदा रेहमान, आशा पारेख आणि हेलन. अंदमानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.' नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : केदार शिंदे पुन्हा चढला बोहल्यावर; पाहा लग्नसोहळ्याचे फोटो

एप्रिल महिन्यातही या तिघींचा एका आयलँडवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये वहिदा रेहमान समुद्रात स्नॉर्कलिंग करत असल्याचं पाहायला मिळत होतं. वहिदा, आशा आणि हेलन या एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी असून काही दिवसांपूर्वी तिघी 'डान्स दिवाने ३'मध्ये झळकल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT