Waheeda Rehman Bollywood Actress Rajesh Khanna esakal
मनोरंजन

Waheeda Rehman : प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रहेमाननं कशी दाखवली समयसूचकता?

‘खामोशी’ चित्रपटातील वहिदा रहेमानची भूमिका ही तिच्या कलाजीवनातील माईलस्टोन ठरावी अशी एक भूमिका होती.

युगंधर ताजणे

- सुभाषचंद्र जाधव

Waheeda Rehman Bollywood Actress : चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. काही दिवसांपूर्वीच हा पुरस्कार अभिनेत्री वहिदा रहेमान यांना प्रदान करण्यात आला.

कुशल अभिनेत्रीबरोबरच वहिदा रहेमान उत्कृष्ट नृत्यांगनाही होती. लहानपणीच ती भरतनाट्यम्‌ शिकलेली होती. नृत्यातील तिचं प्रावीण्य पाहूनच गुरुदत्तनं ‘सीआयडी’मध्ये तिला भूमिका दिली आणि पाहता-पाहता हिंदी चित्रपटसृष्टी वहिदा रहेमाननं काबीज केली. आपल्या नृत्यानं वहिदा रहेमाननं गाइड, ‘तीसरी कसम’ हे चित्रपट जसे गाजविले, तद्वत वहिदा रहेमाननं अनेक चित्रपटांतील भूमिकाही आपल्या सहजसुंदर अभिनयानं अविस्मरणीय करून ठेवलेल्या आहेत.

‘खामोशी’ चित्रपटातील वहिदा रहेमानची भूमिका ही तिच्या कलाजीवनातील माईलस्टोन ठरावी अशी एक भूमिका होती. प्रेमभंगामुळे मानसिक रुग्ण बनलेल्या रुग्णाबरोबर प्रेमाचं नाटक करीत त्याला त्या आजारातून मुक्त करणाऱ्या नर्सची भूमिका वहिदा रहेमाननं या चित्रपटात केली होती; पण या मनोरुग्णाबरोबर प्रेमाचं नाटक करता-करता ही नर्स त्या रुग्णाच्या प्रेमात गुरफटते आणि स्वतःच मनोरुग्ण बनण्याच्या मार्गावर येऊन पोचते, अशी ‘खामोशी’ चित्रपटाची कथा होती.

धर्मेंद्रनं या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून पहिल्या रुग्णाच्या भूमिकेत हजेरी लावलेली होती. हा रुग्ण बरा झाल्यानंतर त्या नर्सला विसरून जातो आणि तिच्या जीवनातून निघून जातो आणि मग प्रेमभंग झालेला दुसरा मनोरुग्ण राजेश खन्ना त्या रुग्णालयात दाखल होतो. परत त्या नर्सला म्हणजे वहिदा रहेमानला या रुग्णाबरोबर प्रेमाचं नाटक करण्याची ट्रीटमेंट देण्याचं काम सोपवण्यात येतं.

१९६९ मध्ये पडद्यावर आलेला कृष्णधवल रंगातील हा चित्रपट असित सेन यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील एका प्रसंगाचं चित्रीकरण चाललेलं होतं. प्रसंग होता- एका बोटीमध्ये मनोरुग्ण बनलेला नायक राजेश खन्ना एक गाणं गातोय. त्या गाण्यातून तो आपल्या जुन्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा देतोय. त्याच वेळी त्याच्याबरोबर असलेल्या नायिकेला म्हणजे वहिदा रहेमानला पहिल्या रुग्णाबरोबर म्हणजे धर्मेंद्रबरोबरच्या घटना आठवू लागतात, त्या वेळी घडलेला हा किस्सा. आणि त्या वेळी वहिदा रहेमाननं दाखवलेली समयसूचकता...

या प्रसंगासाठी गुलजारसाहेबांनी फारच सुंदर काव्यरचना केली होती. त्याला सुरांच्या मयूरपंखी पालखीत विराजमान केलं होतं. गंधर्वगायक हेमंतकुमार यांनी आणि या गाण्याला स्वर दिला होता किशोरकुमारनं. त्याच्या दर्दभऱ्या आवाजानं या गाण्याचं सोनं झालं होतं. ते गाणं होतं,

वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है,

वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है...

या गाण्याचा पहिला अंतरा व्यवस्थित चित्रित झाला; पण दुसरा अंतरा काही चित्रित होण्याचं चिन्ह दिसेना. दुसरा अंतरा असा होता,

मेरा खयाल है अभी, झुकी हुई निगाह में,

खिली हुई हँसी भी है, दबी हुई सी चाह में

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT