The Kashmir Files Movie WhatsApp Scam
The Kashmir Files Movie WhatsApp Scam सकाळ डिजिटल टीम
मनोरंजन

Kashmir Files: पाहण्यासाठी आसामच्या सरकारी कर्मचाऱ्यांना 'हाफ डे'

युगंधर ताजणे

The Kashmir Files: काश्मिर फाईल्सचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसुन आले आहे. आतापर्यत वेगवेगळ्या राज्यातील सरकारनं हा चित्रपट टॅक्स (Entertainment News) फ्री देखील केला आहे. महाराष्ट्रात देखील द काश्मीर फाईल्सवरुन मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चा सुरु झाली आहे. मात्र महाराष्ट्र (Bollywood Movies) सरकारनं हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यास नकार दिला आहे. आता आसाम सरकारनं त्याच्या कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी घ्या पण काश्मिर फाईल्स चित्रपट पाहण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील नेटकऱ्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotry) दिग्दर्शित काश्मिर फाईल्स हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित झाला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Assam Minister Notice Watched The Kashmir Files) यांनी दोन दिवसांपूर्वी एक वेगळीच घोषणा मंत्रीमंडळात केली. त्याकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले आहे. ती घोषणा अशी आहे की, आपल्या राज्यात शासकीय सेवेत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी काश्मिर फाईल्स पाहण्याचे आवाहन केले आहे. काश्मिर फाईल्समध्ये काश्मिरी पंडित, त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि त्यांचे स्थलांतर यासारखे विषय हाताळण्यात आले आहे. आतापर्यत या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आहे. 50 कोटींच्या पुढे या चित्रपटानं कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिर फाईल्सचं कौतूक करताना आगामी काळात मिशन गंगा सारख्या उपक्रमांवर देखील चित्रपट येण्याची गरज असल्याचे सांगितले होते.

Kashmir Files

दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंत यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन करताना चित्रपट पाहिल्यावर त्याचे तिकिट संबंधित कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्याला अर्धा दिवस सुट्टी मंजुर केली जाईल असे सांगितले आहे. यापूर्वी या मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीमध्ये आपल्या सगळ्य़ा मंत्रीमंडळासमवेत काश्मिर फाईल्स हा चित्रपट पाहिला. आणि त्यावर प्रतिक्रियाही दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, काश्मिरी पंडिताबाबत जे काही झाले ते हदयद्रावक आहे. ते वेदनादायी आहे. त्या व्यक्तींबाबत काय झाले हे जाणून घेण्यासाठी काश्मिर फाईल्स पाहायला हवा. आपण हा चित्रपट पाहून प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

काश्मिर फाईल्समध्ये अभिनेत्री पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या देशभर काश्मिर फाईल्सची मोठ्या प्रमाणवर चर्चा असून त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली असून त्याचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT