bellbottom teaser 
मनोरंजन

'बेल बॉटम'चा टिझर रिलीज, ८० च्या दशकातील अक्षय कुमारचा जबरदस्त लूक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'बेलबॉटम' सिनेमाचा पहिला टिझर रिलीज आहे. हा टिझर पाहिल्यावर तुम्ही थेट ८० च्या दशकात पोहोचाल. या जबरदस्त टिझरमध्ये तुम्हाला अक्षय कुमारचा टिप-टॉप सुटाबुटातला लूक पाहता येईल. याशिवाय त्याच्या विमानातील प्रवास देखील हटके पद्धतीचा आहे. विशेष म्हणजे या टिझरमधून सिनेमाची भव्यता दिसतेय. हा तोच सिनेमा आहे जो लॉकडाऊननंतर शूट करणार पहिला सिनेमा आहे. या सिनेमाचं शूट संपवून याचा टिझर देखील रिलीज झाल्याने खिलाडी कुमारचे चाहते त्याच्या कामावर चांगलेच इंप्रेस आहेत. 

या सिनेमात तुम्हाला रेट्रो स्पाय थ्रिलर ड्रामा पाहायला मिळेल. ३० सेकंदाच्या या टिझरमध्ये सुरुवातीला अक्षय कुमार बेल बॉटम पॅन्ट घालून येतो आणि एका विमानाजवळून निघतो. त्यानंतर तो एका नव्या अंदाजात दिसून येतो. या टिझरमध्ये फक्त अक्षय कुमारंच आहे. या सिनेमात अनेक सेलिब्रिटी असल्याने कदाचित येत्या काळात सिनेमातील प्रत्येक पात्राचा टिझर पाहायला मिळेल.

अक्षय कुमार या सिनेमात रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. अक्षय सोबत या सिनेमात वाणी कपूर, हुमा खुरेशी आणि लारा दत्ता देखील आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन रंजीत एम तिवारी यांनी केलं आहे. अक्षय कुमारचा बहुचर्चित 'बेलबॉटम' हा सिनेमा २ एप्रिल २०२१ ला रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या शूटींगसाठी अक्षय कुमारने त्याचा १८ वर्षांपासूनचा एक नियम मोडित काढला.

अक्षय १८ वर्षांपासून एका दिवसात ८ तास काम करत होता मात्र या सिनेमासाठी त्याने डबल शिफ्टमध्ये काम केलं आहे. त्याचा उद्देश प्रोडक्शनचं आर्थिक नुकसान वाचावं असा होता. याचाच परिणाम म्हणून या सिनेमाचा टिझर इतक्या लवकर प्रेक्षकांसमोर आणला गेला आहे. 'बेलबॉटम' सिनेमाने तसा रेकॉर्डचं केला आहे कारण लॉकडाऊननंतर शूट सुरु करणारा हा पहिला सिनेमा होता. आता तर शूट संपवून टिझर रिलीज करणारा देखील पहिला सिनेमा ठरलाय. काही दिवसांपूर्वीच हा सिनेमाचं शूट संपवून या सिनेमाची टीम परतली होती.    

watch teaser of bell bottom akshay kumar look as raw agent  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT