Pratik Gandhi Nirmala 
मनोरंजन

केमचो मजामा? पुढचा धमाका कब है  प्रतीक भाई?

सकाळवृत्तसेवा

हिंदी वेब सिरीज 'स्कॅम 1992 'मुळे अभिनेता प्रतिक गांधीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रतिकने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याने विशेष स्थान निर्माण केले. 'स्कॅम 1992' ह्या वेब सिरीजचे कथानक हर्षद मेहता या स्टॅाक ब्रोकरच्या जीवनावर आधारीत आहे. या वेब सिरीजमधील हर्षद मेहताची भूमिका प्रतिक गांधीने केली. या वेब सिरीजचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे.

सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पावर अनेकांनी भाष्य केले आहे. यावर बॅालिवूड सेलिब्रिटींनी काही प्रतिक्रिया दिली नाही. पण प्रतिक गांधीने हर्षद मेहताच्या स्टाईलमध्ये बजेटवर भाष्य केले आहे. प्रतिकने कोणतीही कमेंट शेअर केली नाही पण 'स्कॅम 1992' मधील एक सीन ट्विटरवर पोस्ट केला आहे.या सिनमध्ये हर्षद मेहता म्हणजेच प्रतिक गांधी १९९० च्या सुरुवातीच्या काळातील अर्थसंकल्पाचा आढावा घेत आहे.

या सीनमध्ये हर्षद मेहता म्हणतो, "यात काही शंका नाही की हे एक उत्तम अर्थसंकल्प आहे,". या डायलॅाग बरोबरच भारतीय अर्थसंकल्पावर हर्षद मेहताचे काय मत होते तेही सांगितले आहे. या व्हिडिओला #बजेट २०२१ असे कॅप्शन प्रतिकने दिले आहे. या ट्टिटला ५ हजार लाईक्स आले असून आणि ९ हजार जणांनी रिट्विट केले आहे. 'पुढचा धमाका कब है प्रतीक भाई .. केमचो मजामा?', 'पूर्णपणे बरोबर प्रतीक भाई' अशा हटके प्रतिक्रिया प्रतिकच्या ट्विटला आल्या आहेत.

केवळ प्रतिकच नव्हे तर या वेब सिरीजचे दिग्दर्शक  हंसल मेहता यांनीही बजेटबद्ल प्रतिक्रिया दिली. त्यांनी या वेब सिरीजमधील सीतारमण या भूमिकेचा फोटो शेअर केला आणि "सीतारमण अर्थसंकल्प सादर करीत आहे. #स्कॅम 1992' असे लिहीले आहे. या फोटोमध्ये सीतारमणने हातात केळी ठेवली आहे. त्यामुळे हंसल मेहता अर्थसंकल्पाबद्दल नक्की काय म्हणायचे आहे हे नेटकर्यांना नक्कीच समजले असावे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT