web series tandav controversy mukesh Khanna angry on saif ali khan Zeeshan Ayyub says do not cross the limit 
मनोरंजन

शक्तिमान भडकला म्हणाला,आता हिंदू शांत बसणार नाहीत 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणा-या मालिकांमुळे समाजातील वातावरण दूषित होत असल्याचा आरोप काही राजकिय पक्ष, धार्मिक संघटना यांनी केला आहे. यासगळ्यात धार्मिक भावना दुखावून निर्माते आणि दिग्दर्शक यांना काय मिळते असा सवाल त्यांनी विचारला आहे. काहींनी याप्रकरणी न्यायालयात धावही घेतली आहे. त्यात तांडव मालिकेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्या मालिकेच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांच्या भावना दुखावणे हे खपवून घेतले जाणार नाही. असे म्हटले होते. यासगळ्या परिस्थितीत ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी ओटीटी माध्यमकर्मींना सुनावले आहे.

शक्तिमान या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले मुकेश खन्ना यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. ते त्यांच्या परखड स्वभावाबद्दलही प्रसिध्द आहेत. आता त्यांनी तांडव मालिकेच्या निर्मात्यांवर टीका करताना धार्मिक भावना दुखावणा-या ओटीटी प्लॅटफॉर्म विषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना टोकदार शब्दांत खन्ना यांनी सुनावले आहे.ते म्हणाले, गेल्या काही काळापासून आपल्या विचार,गोष्टींना लक्ष्य करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्यात आता काही दिवसांपूर्वी आलेल्या तांडवनं सगळे वातावरण दूषित करुन टाकले आहे. अशावेळी मला प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे या गोष्टी तुम्हाला कशा दिसत नाहीत, सेसाँर बोर्ड काय करते. आपल्या देशातील माहिती आणि प्रसारण प्रशासन काय करते, ते अशा गोष्टींकडे लक्ष का देत नाही. असा सवाल मुकेश खन्ना यांनी विचारला आहे.

हिंदू धर्माचा थट्टा चालवली आहे. त्याचा वापर केला जात आहे. प्रशासनानं वेळीच कारवाई केली तर तांडव सारख्या मालिका तयार होणार नाहीत. आता अॅमेझॉन प्राईम हे असे ओटीटी प्लॅटफॉर्म झाले आहे की, ते एक दुकान आहे ज्यात काहीही विकले जात आहे. बाहेर देशातील असल्यानं त्यांची एक वेगळ्या प्रकारची विचारधारा आहे. ती पॉलिसी आहे. आपण त्याचा विचार करत नाही. म्हणून अनेक गोष्टी आपल्यापर्यत वेगळ्या पध्दतीनं पोहोचवल्या जातात. असेही खन्ना यांनी यावेळी सांगितले.

वादग्रस्त मालिकांध्ये कलाकार मुस्लिम असतो आणि दिग्दर्शकही. हे जाणीवपूर्वक केले जाते असे मला म्हणायचे नाही. मात्र मग त्यांना आता हे सिध्द करावे लागेल. कारण हिंदू शांत बसणार नाहीत. जे अशाप्रकारचे समाजातील वातावरण दुषित करणारं तयार करत असतील त्यांच्यावर सेसाँरनं कारवाई करायला हवी. चीनमध्ये गुगल बंद आहे. ते तसे करु शकतात तर त्यांच्यापेक्षा आपण जास्त समजदार आहोत. असे मत मुकेश यांनी व्यक्त केले. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT