actress priyamani Team esakal
मनोरंजन

The Family Man 2: प्रियामणिचा जबरदस्त लूक पाहिलात?

फॅमिली मॅनच्या दुस-या सीझनची चर्चा आता सुरु झाली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - फॅमिली मॅनच्या दुस-या सीझनची चर्चा आता सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरापासून या मालिकेच्या तारखेवरुन घोळ सुरु होता. आता तो गुंता सुटला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही मालिका प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रसिध्द अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpei) आणि त्याच्या पत्नीची भूमिका करणारी प्रियामणि (priyamani) यांचीही जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या या मालिकेतील तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. समंथाच्या चाहत्यांनी तिच्या त्या लुकचे कौतूक केले आहे. (web series the family man south indian actress priyamani looks so hot photoss viral on social media)

फॅमिली मॅनच्या पहिल्या सीझनला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. दुस-या (The Family Man 2 ) सीझनलाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा चाहत्यांना आहे. आता त्या मालिकेच्या दुस-या सीझनचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिध्द असणारी अभिनेत्री म्हणून प्रियामणि प्रसिध्द आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. अशावेळी पुन्हा एकदा दुस-या सीझनच्या निमित्तानं ती चाहत्यांसमोर आली आहे. तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या मालिकेत भलेही तिचा लुक साधासा वाटत असेल. मात्र प्रत्यक्षात ती कमालीची बोल्ड आहे.

द फॅमिली मॅन 2 मालिका आता 11 नव्हे तर 4 जूनला प्रदर्शित होणार आहे. प्रसिध्द मालिका तांडव पासून फॅमिली मॅनविषयी बोलले जात होते. मात्र ही मालिका वादाच्या भोव-यात सापडली होती. अखेर तिचं लग्न झालं आहे. मनोज वाजपेयीनं श्रीकांतची भूमिका वठवली आहे. तर दुसरी साऊथची सुपपस्टार समंथा अक्किनेनीही दिसणार आहे. आता सगळ्यात जास्त चर्चा प्रियामणिच्या लुकची होताना दिसत आहे. तिनं आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. प्रियामणिनं अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. तसेच तिनं तीनवेळा फिल्मफेअर अॅवॉर्डही जिंकले होते. तसेच तिला 2005 मध्ये पारुथीवीरन चित्रपटासाठी नॅशनल अॅवॉर्डही मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT