welcome to the jungle welcome 3 announcement akshay kumar paresh rawal sunil shetty raveena tondon SAKAL
मनोरंजन

Welcome 3 Teaser: अख्खं बॉलिवूड एकाच सिनेमात, अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त 'वेलकम टू द जंगल' ची घोषणा

अक्षय कुमारच्या वेलकम 3 ची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Welcome To The Jungle News: अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त आज वेलकम टू द जंगल सिनेमाची घोषणा झालीय.

अक्षय कुमारच्या वेलकम टू द जंगल सिनेमाची खास पद्धतीने घोषणा करण्यात आलीय. या सिनेमाच्या टीझर अनाउंन्समेंट मध्ये असंख्य बॉलिबूड कलाकार दिसत आहेत

वेलकम 3 ची खास घोषणा

वेलकम 3 म्हणजेच वेलकम टू ग जंगल सिनेमात बॉलिवूड कलाकारांची फौज आहे. अक्षय कुमार, परेश रावल यांच्यासह सुनील शेट्टी, संजय दत्त, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडीस, दिशा पटानी, जॉनी लिव्हर, तुशार कपूर अशा कलाकारांच्या सिनेमात भुमिका आहेत.

एकूणच वेलकम 3 मध्ये संपूर्ण बॉलिवूड अवतरलेलं दिसतंय. सिनेमाचा ३ मिनिटांचा खास व्हिडीओ सध्या चांगलाच लक्ष वेधून घेतोय.

नाना पाटेकर, अनिल कपूर शिवाय मज्जा नाही

वेलकम चे पहिले दोन्ही भाग नाना पाटेकर, अनिल कपूर यांनी गाजवले. नाना आणि अनिल यांनी उदय आणि मजनू भाईच्या भुमिकेत झळकले होते. दोघांची अफलातुन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली.

पण वेलकम टू द जंगल सिनेमात मात्र नाना आणि अनिल दिसत नाहीत. त्यामुळे प्रचंड निराशा झालीय. अनेक जण नाना आणि अनिल शिवाय वेलकम 3 ला काही अर्थ नाही असं म्हणत आहेत.

कधी रिलीज होणार वेलकम 3

अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त स्वतःला आणि त्याच्या फॅन्सला गिफ्ट दिलंय. वेलकम 3 यावेळी जंगल थिमवर आधारीत असल्याचं समजतंय.

अक्षय कुमारच्या वेलकम 3 चं शुटींग लवकरच सुरु होणार असुन हा सिनेमा पुढील वर्षी डिसेंबर २०२४ ला ख्रिसमसला रिलीज होणार आहे. इतके सारे कलाकार वेलकम 3 मध्ये असल्याने हा सिनेमा मनोरंजनाचं पॅकेज असणार यात शंका नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT