Shah Rukh Khan wirh Aryan Khan
Shah Rukh Khan wirh Aryan Khan Google
मनोरंजन

आर्यन खानबद्दल शाहरुखनं केलं मोठं वक्तव्य

प्रणाली मोरे

आर्यन खान(Aryan khan) हा शाहरुख खानचा(ShahRukh Khan) मोठा मुलगा. वयवर्षे २३. काही महिन्यांपूर्वीपर्यंत शाहरुखचा जबाबदार मुलगा,यशस्वी मुलगा अशी ओळख हा पुढे जाऊन करेल असं मत त्याच्याविषयी निश्चितच सगळ्यांचं होतं. पण ड्रग्ज केसप्रकरणी त्याला एनसीबीनं अटक केली आणि त्यानंतरचा पुढे महिनाभर तो जेलमधला त्याचा प्रवास,त्यासंदर्भात समोर आलेल्या सत्यानं लागलीच त्याच्याविषयीचं मत जनमानसात थोडं नकारात्मक बनलं. त्याच्यामुळे शाहरुख आणि गौरी खानवर आई-वडील म्हणून जी नामुष्की आली ती सगळ्यांनीच पाहिली. पण मुलाची साथ देणं,त्याला संकटातून बाहेर काढणं,मार्गावर आणणं यासाठी जे-जे करावं लागेल ते त्या दोघांनी केलं. यातील कुठलीच गोष्ट लपून राहिली नाही. आर्यन सुटल्यानंतरही कितीतरी दिवस शाहरुख-गौरीनं सगळ्यांना भेटण्यापासूनच नाही तर सोशल मीडियापासूनही दूर राहण पसंत केलं होतं.

Shah Rukh Khan with Little Aryan

लहानग्या आर्यन सोबत शाहरुख खानचा फोटो.

पण आता अनेक दिवसांनी शाहरुख खानने आर्यन खानसंदर्भात भाष्य केलेली एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुखला त्याच्या मुलांना तो किती वेळ देतो? त्यांच्याशी त्याचं नातं कसं आहे याविषयी प्रश्न करण्यात आला आहे. तेव्हा शाहरुख हा आर्यनचाच पिता होता. ते त्याचं आणि गौरीचं पहिलं अपत्य. १९९७ साली आर्यनचा जन्म झाला. त्यानंतर सुहाना खान आणि मग सरोगसीच्या माध्यमातनं जन्माला आलेला तिसरा मुलगा अब्राहम. पण शाहरुख तेव्हा म्हणाला होता की आर्यन जन्माला आला तेव्हा मला लोकांनी विचारलं की नव्या वडिलांच्या भूमिकेत कसं वाटतय? पण मी प्रत्येकाला म्हणालो,''मला नवीन काहीच वाटत नाही. उलट मी खूप आनंदात आहे. जबाबदारी वाढली अस समजून दडपणात नाही. माझ्या मुलाच्या रुपात मला मित्र मिळाला आहे. माझं आणि त्याचं नातं हे कायम मित्रासारखंच असेल''.

शाहरुख खान आर्यनचा पिता झाला तेव्हा तो ऑलरेडी मोठा स्टार झाला होता. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सारखा सुपरहिट सिनेमा त्याच्या नावावर होता. तेव्हा मुलाखतकाराने ''कुटुंबाला वेळ देता येतो का?'' विचारल्यावरही शाहरुख लगेच म्हणाला,''हो. मी माझ्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो. कितीही प्रवास करून त्यांना भेटायला जायचे असेल तरी मी जातोच''. आजही तीन मुलांचा पिता झाल्यावरही शाहरुख आपल्या मुलांना वेळ देताना दिसतोच. अनेक सण तो आपल्या मुलांसोबत सेलिब्रेट करताना दिसतो. फॅमिली टाईम एन्जॉय करताना दिसतो. पण मुलाशी इतकं मैत्रित्वाचं नातं त्यानं त्याच्या जन्मापासून ठेवूनही आज पोटच्या मुलानं त्याच्यावर काय वेळ आणली हे मात्र डोक्यातनं जात नाही. असो,आतातरी आर्यनला शहाणपण सुचो अनं आपल्याला मित्र समजणाऱ्या वडिलांची मान पुन्हा खाली जाणार नाही यासाठी त्याला सदबुद्धी मिळो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT