Shahnaz Gill Birthday Sakal
मनोरंजन

Shahnaz Gill Birthday: शहनाजनं केला होता आत्महत्येचा प्रयत्न... कारण वाचून बसेल धक्का

बिग बॉस'मधून शहनाजने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले, याआधी ही अभिनेत्री पंजाबची मॉडेल होती.

सकाळ डिजिटल टीम

Shahnaz Gill Birthday: पंजाबची कतरिना कैफ म्हणून प्रसिद्ध असलेली शहनाज गिलला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ही अभिनेत्री इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि तिच्या चाहत्यांची कमी नाही.

'बिग बॉस'मधून या अभिनेत्रीने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले, याआधी ही अभिनेत्री पंजाबची मॉडेल होती. शोमधील तिची फनी स्टाइल आणि सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची बॉन्डिंग पाहून सगळेच तिचे फॅन झाले.

ही अभिनेत्री आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. पण खूप कमी लोकांना माहित असेल की, स्वभावाने अतिशय विनोदी असलेल्या याच शहनाज गिलने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. होय, याचा खुलासा खुद्द तिच्या वडिलांनी एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

शहनाज गिल हे आज एक प्रसिद्ध नाव आहे, एक काळ असा होता जेव्हा तिला पंजाबमध्ये काम मिळणे कठीण होते. ज्यांनी बिग बॉस 13 चा सीझन पाहिला आहे त्यांना माहित असेल की शहनाज गिल व्यतिरिक्त हिमांशी खुराना देखील शोमध्ये दिसली होती.

या दोघांमध्ये दुश्मनी होती. खरं तर, शहनाज गिलने तिच्या एका लाइव्ह शोमध्ये हिमांशीच्या आय लाइक इट गाण्याला वाईट म्हटले होते, ज्यानंतर हिमांशीने प्रत्युत्तर दिले, त्यानंतर दोघांमध्ये खूप तू-तू-मैं-मैं सुरू झाली. शहनाजच्या वडिलांनी सांगितले होते की हिमांशीच्या बोलण्याने नाराज होऊन शहनाजने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.

मात्र, संतोख सिंग गिलच्या या मुलाखतीनंतर हिमांशी खुराणा हिनेही याला प्रत्युत्तर देत माझ्यामुळे तुमच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असेल, तर त्याबद्दल माफ करा, पण तुम्ही तुमच्या मुलीला समजावून सांगा की, आधी वाद स्वतःच करा, मग.

स्वतःला त्रास द्या. तुमच्या मुलीने स्वत: कॅनडातील एका मुलाखतीत सांगितले की, मला केवळ वादामुळेच काम मिळत आहे. म्हणूनच तुम्ही, विचारपूर्वक मुलाखत द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: पाऊस थांबायचं नाव नाही! पुण्यात दरड कोसळली, नाशिकला ढगफुटीचा इशारा अन्...; आज कुठे काय घडलं? वाचा संपूर्ण अपडेट

IND vs ENG, 3rd T20I : भारताविरुद्ध आघाडी घेण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज! सामन्यासाठी यजमानांची Playing XI जाहीर

11th Special Round Extended: अतिवृष्टीचा फटका: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीची मुदत बुधवारीपर्यंत वाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर

Pune Heavy Rain Alert: कर्जत घाटात दरडींचा तडाखा; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, १६ गाड्या रद्द

U19 IND vs SL : ९ चौकार अन् १ षटकार... द्रविडच्या लेकाची जोरदार फटकेबाजी; पण श्रीलंकेने सामना जिंकत केली ODI मालिकेत बरोबरी

SCROLL FOR NEXT