Annu Kapoor and Smita Patil 
मनोरंजन

Smita Patil |स्मिता पाटील यांच्यावरील संकटाची अनु कपूर यांना होती कुणकुण

स्मिता पाटील यांची हस्तरेषा पाहून अनु कपूर यांनी दिला होता महत्त्वाचा इशारा

स्वाती वेमूल

१३ डिसेंबर १९८६ रोजी जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील Smita Patil यांच्या निधनाचं वृत्त आलं, तेव्हा संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली होती. ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वी अभिनेते अनु कपूर Annu Kapoor यांनी त्यांना संकेत दिले होते की ते वर्ष स्मिता यांच्यासाठी फार कठीण जाणार आहे. यासाठी सांभाळून राहण्याचा सल्ला अनु कपूर यांनी स्मिता यांना दिला होता. या प्रसंगाचा उल्लेख अनु कपूर यांनी त्यांच्या 'सुहाना सुफर विथ अनु कपूर' या रेडिओ शोमध्ये केला होता.

ते म्हणाले, "२२ जानेवारी १९८६ रोजी मी आणि स्मिता पाटील एका प्रोजेक्टसाठी काम करत होतो. सत्यजित रे यांची एक मालिका होती. त्यात मी स्मिता पाटील यांच्या पतीच्या भूमिकेत होतो. तीन दिवस या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. २६ जानेवारी १९८६ रोजी आम्ही कोलकाताहून मुंबईला परतीचा प्रवास करत होतो. त्यावेळी मला हस्तरेषा पाहून भाकित वर्तवण्याची खूप हौस होती. स्मिता यांनी मला त्यांच्या हस्तरेषा पाहण्याची विनंती केली होती. तेव्हा त्यांच्या हातावरील जीवनरेषेला कोणतीच भाग्यरेषा मिळत नसल्याचं दिसलं."

हस्तरेषा पाहताना अनु कपूर स्मिता यांना म्हणाले होते, "हे वर्ष तुझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. जरा जपून रहा." त्यानंतर काही महिन्यांतच १३ डिसेंबर रोजी स्मिता पाटील यांचं निधन झालं. चित्रपटसृष्टीतील संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून स्मिता पाटील ओळखल्या जायच्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT