Avika Gor  
मनोरंजन

'बालिका वधू' मालिकेच्या कमाईचं काय केलं?; अविकाचा व्हिडीओ व्हायरल

अविकाने 'बालिका वधू' या मालिकेत आनंदीची भूमिका साकारली होती.

स्वाती वेमूल

अभिनेत्री अविका गौर Avika Gor 'बालिका वधू' Balika Vadhu या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली होती. मालिकेत काम करताना अविका १२-१३ वर्षांची होती. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिने मालिकेतून मिळालेल्या पैशांचं काय करते, याचं उत्तर दिलं होतं. २००९ मध्ये 'काऊच विथ कोयल' या शोमध्ये तिने हजेरी लावली होती. त्यावेळी अविका १२ वर्षांची होती. 'मालिकेत काम केल्यामुळे मिळालेल्या पैशांचं तू करतेस', असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. (When Avika Gor revealed where her Balika Vadhu earnings go)

निवेदिका कोयल पुरीने अविकाला हा प्रश्न विचारला होता. त्यावर अविका म्हणाली, 'माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ते इन्शुरन्स फंडात पैसे जमा करत आहेत आणि तुम्हाला माहितीये का, माझ्या 'पिगी बँक'मध्ये ५२२२ रुपये जमा आहेत.' या जमा केलेल्या पैशांचं काय करणार असं विचारलं असता ती पुढे म्हणाली, 'मी माझ्यासाठी काहीतरी चांगली वस्तू खरेदी करेन.'

अविका आता २४ वर्षांची झाली आहे. ती सध्या मिलिंद चंदवानीला डेट करतेय. 'ससुराल सिमर का' या मालिकेतील सहकलाकार मनिष रायसिंघन याच्यासोबतही अविकाचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र या चर्चा खोट्या असल्याचं तिने नंतर एका मुलाखतीत स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tragic Incident Kolhapur : कोल्हापूर जवळील प्रयाग चिखलीतील अवघ्या १५ वर्षीय मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, आई वडील बाहेरगावी गेले अन्

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरु

CA Success Story: आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत ओंकार झाला ‘सीए’; आई-वडील, बहिणीच्या डाेळ्यातून आनंद अश्रू, संघर्षमय यशाचे कौतुक

Mahabharat War: कसं घडलं महाभारातातील युद्ध? AI LIVE रिपोर्टींग VIRAL, ५१४२ वर्षे मागे जाल, साक्षात कृष्ण-अर्जुन सर्वांना पाहाल

शतकीय खेळीनंतरही यशस्वी जैस्वाल संघाबाहेर, तर आयुष्य म्हात्रेला संधी; रणजी सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर...

SCROLL FOR NEXT