dilip kumar
dilip kumar 
मनोरंजन

‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांनीही भोगला होता तुरुंगवास

शर्वरी जोशी

बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांचा जीवनप्रवास आज (७ जुलै) संपला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांमध्ये दिलीप कुमार यांनी अनेकदा मृत्यूला चकवा दिला. मात्र, आज अखेर त्यांना मृत्यूने गाठलं. दिलीप कुमार यांचं निधन झाल्यानंतर कलाविश्वासह चाहत्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अनेकांनी दिलीप कुमार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. कलाविश्वात भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने देशसेवेतही योगदान दिलं आहे. विशेष म्हणजे ब्रिटीशांविरोधी लढा दिल्यामुळे त्यांना एकेकाळी तुरुंगवासही भोगावा लागला होता. (when-dilip-kumar-was-arrested-in-the-freedom-struggle)

दिलीप कुमार यांनी "दिलीपकुमार : दि सबस्टन्स अँड शॅडो या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये जीवनातील अनेक लहान-मोठ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्येच त्यांनी तुरुंगवास भोगल्याचाही उल्लेख केला आहे. केवळ तुरुंगवासच नाही तर त्यांनी देशासाठी उपोषणदेखील केलं आहे.

स्वातंत्र्यलढ्याचा जोर वाढलेला असताना दिलीप कुमार पुण्यातील हवाई दलाच्या कँटोन्मेंटमधील कँटीनमध्ये काम करत होते. त्यावेळी ब्रिटीशांविरोधी भाषण केल्यामुळे त्यांनी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना येरवड्याच्या तुरुंगात अन्य सत्याग्रहींसोबत डांबण्यात आलं होतं. त्यावेळी तुरुंगातील जेलर आणि अन्य अधिकारी त्यांना गांधीवाला अशी हाक मारत. खरं पाहता ते गांधीवादी किंवा महात्मा गांधींचे अनुयायी नसतानादेखील त्यांना त्या नावाने संबोधलं जायचं याचं त्यांना आश्चर्य वाटायचं असं त्यांनी आत्मचरित्रात म्हटलं आहे.

दरम्यान, ज्या तुरुंगात दिलीप कुमार यांना ठेवण्यात आलं होतं. त्याच तुरुंगात सरदार वल्लभभाई पटेल यांनाही कैदेत ठेवण्यात आलं होतं, असं म्हटलं जातं. त्यावेळी वल्लभभाई पटेल यांचं समर्थन करण्यासाठी तुरुंगातील कैद्यांनी एक दिवस उपोषण केलं होतं. त्यात दिलीप कुमारांचादेखील सहभाग होता. मात्र, त्यांनी या उपोषणात सहभाग का घेतला यामागचं कोडं त्यांनीही उलगडलं नव्हतं असं ते म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

SCROLL FOR NEXT