hrithik sussane  
मनोरंजन

जेव्हा हृतिक म्हणाला, "..म्हणून मी दुसऱ्या लग्नाचा विचार करत नाही"

स्वाती वेमूल

बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. २०१४ मध्ये हृतिकने पत्नी सुझान खानला घटस्फोट दिला. लग्नाच्या १५ वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. मात्र घटस्फोटानंतरही या दोघांनी आपली मैत्री कायम ठेवली. आजही मुलांसाठी हे दोघं नेहमीच एकत्र येतात. मध्यंतरीच्या काळात त्याचं अभिनेत्री कंगना राणावतशी अफेअरच्या चर्चा रंगल्या. मात्र एका मुलाखतीत दुसऱ्या लग्नाबद्दल हृतिकला प्रश्न विचारला असता, त्याने साफ नकार दिला होता. 

२०१७ मध्ये 'काबिल' चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त हृतिकने फिल्मफेअरला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल व्यक्त झाला होता. "मी दुसऱ्या लग्नाचा विचारच करत नाही. कारण मी आता जसा आहे, त्यात संतुष्ट आणि समाधानी आहे", असं उत्तर हृतिकने दिलं होतं. घटस्फोटानंतरही हृति आणि सुझान मिळून रेहान आणि रिधान या दोन मुलांची देखभाल करतात. 

देशभरात जेव्हा लॉकडाउन घोषित करण्यात आला होता, तेव्हासुद्धा सुझान हृतिकच्या घरात राहायला गेली होती. आपल्या मुलांसाठी हा निर्णय घेतल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. तिच्या या निर्णयाचं हृतिक व राकेश रोशन यांनी स्वागत केलं. इतकंच नव्हे तर हृतिकने सोशल मीडियावर सुझानचे आभार मानले होते. हृतिक आणि सुझानची मैत्री पाहता हे दोघं पुन्हा एकत्र येतील का, अशाही चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा सुझानने ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम दिला. 'मी लोकांना विनंती करते की त्यांनी असे अंदाज बांधू नयेत, हृतिकसोबत मी पुन्हा कधीच एकत्र येणार नाही. पण आम्ही दोघं चांगले पालक बनण्याचा नक्कीच प्रयत्न करू', असं तिने लिहिलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT