Jaya Bachchan
Jaya Bachchan Google
मनोरंजन

कॉलेजच्या दिवसांतही जया बच्चन यांचा दरारा होता; 'बंगाली वाघीण' म्हणायचे...

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु करण्यापूर्वी पासून जया बच्चन(Jaya Bachchan) आणि डॅनी डेन्जोंग्पा(Danny Denzongpa) हे दोघे' भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजन संस्था' म्हणजेच FTII मध्ये एकत्र शिकत होते. ते एकमेकांचे चांगले वर्गमित्र होते. एका जुन्या मुलाखतीत डॅनी यांनी सांगितलं होतं की,'एफटीआईआई मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांचे वरिष्ठ आणि वर्गातील मुलं त्यांना नावावरुन चिडवायची. तेव्हा जया यांनी यावर तोडगा काढण्यासाठी त्यांना एक आयडिया दिली होती''. जया यांचा आज ७४ वा वाढदिवस आहे,त्यानिमित्तानं एका जुन्या मुलाखतीमध्ये डॅनी यांनी खुलासा केला होता की जया यांनी डॅनीला नवीन नाव दिलं होतं. त्याविषयीच्या आठवणींना आज पुन्हा उजाळा दिला आहे.

डॅनी डेन्जोंग्पा यांचं खरं नाव आहे शेरिंग फिंटसो डेन्जोंग्पा. त्यांनी १९७२ पासून सिनेइंडस्ट्रीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'चोर मचाए शोर',' ३६ घंटे', 'कालीचरण', 'संग्राम','काला सोना','देवता','आशिक हू्ॅं बहारो का','पापी','द बर्निंग ट्रेन'... अशा अनेक सिनेमांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. २०१८ च्या फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत डॅनी यांनी म्हटलं होतं,''जया एफटीआईआई मध्ये माझ्याबरोबर शिकत होती. तिथे एका कार्यक्रमात प्रत्येकाला आपली ओळख करुन द्यावी लागते. तेव्हा मी माझं नाव जेव्हा शेरिंग फिनसो डेन्जोंगपा असं सांगितलं तेव्हा अनेकांना ते कळालं नाही, मी पुन्हा पुन्हा सांगून देखील. सगळे मला पुन्हा पुन्हा ते नाव सांगायला सांगू लागले. आणि माझी थट्टा-मस्करी करू लागले. मला विचित्र पद्धतीनं हाक मारुन सगळे बोलवायचे. तेव्हा जयानं मला एक आयडिया दिली. तिनं मला नावात साधेपणा ठेवायला सांगितला. आणि माझं नाव 'डॅनी' ठेवलं. एवढंच नाही बंर का,जया यांनी पुढेही अनेकदा डॅनी यांचं रक्षण केलं आहे.

डॅनी तेव्हा मुलाखतीत म्हणाले होते,''जया इमानदार आहे,पण वाकड्याशी कसं वाकड्यात जाऊन वागायचं तिला बरोबर माहित आहे. ती अनेक गोष्टीत माझ्यासारखी आहे. जेव्हा ती नवीन विद्यार्थिनी होती ते व्हा ती आपल्या मित्रांच्या बचावासाठी पुढाकार घ्यायची. एकदा एका पार्टीत एका सिनेनिर्मात्यानं माझी थट्टा केली तेव्हा जयानं त्याला चांगलंच फटकारलं होतं. ती भले छोटी दिसत असेल पण ती एक 'बंगाली वाघीण' आहे असं डॅनी म्हणाले होते'.

जया बच्चन यांनी हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'गुड्डी' या सिनेमापासून बॉलीवूडमध्ये सुरुवात केली. त्यानंतर 'उपहार','कोशिश','जंजीर','अभिमान','कोरा कागज','चुपके चुपके','मिली','शोले','नौकरी','सिलसिला'... अशा अनेक सिनेमांतून काम केलं आहे. १७ वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी पहिल्यांदा सिनेमात काम केलं ते गोविंद निहलानी यांच्या 'हजार चौरासी की मॉं' मध्ये. त्यानंतर 'फिजा','कभी खुशी कभी गम','कल हो ना हो' मध्ये त्यांनी आपल्या अभिनयानं पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता पुन्हा करण जोहरच्याच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात त्या दिसणार आहेत. या सिनेमात रणवीर सिंग,आलिया भट्ट,धर्मेंद्र,शबाना आझमी देखील दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; जाणून घ्या बेंगळुरू-चेन्नईची प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT