When Madhuri Dixit said she would never marry Anil Kapoor Google
मनोरंजन

'मला अनिल कपूर नवरा म्हणून ...', 33 वर्षांपूर्वी माधुरीनं केलेलं मोठं विधान

माधुरी दिक्षित आणि अनिल कपूर यांना सिनेइंडस्ट्रीतली एकेकाळची सुपरहिट जोडी म्हणून ओळखलं जातं.

प्रणाली मोरे

माधुरी दिक्षित(Madhuri Dixit) आणि अनिल कपूर(Anil Kapoor) ही जोडी सिनेइंडस्ट्रीतली एकेकाळची सुपरहिट जोडी. या दोघांनी मिळून खूप सिनेमे केले आहेत,ज्यांनी बॉक्सऑफिसवर चांगला बिझनेसही केला आहे. दोघं कोणताही अॅक्ट करताना एकत्र स्क्रीनवर आजही दिसले की सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. त्या दोघांची ऑन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री भन्नाट आहे. पण ३३ वर्षांपूर्वी जेव्हा माधुरीला अनिल कपूरशी लग्न करेल का? असं विचारलं गेलं होतं तेव्हा तिनं साफ नकार दिला होता. इतकंच नाही तर ती असं देखील म्हणाली होती की,अनिलच काय तर त्याच्यासारख्या कोणत्याच व्यक्तीशी ती लग्न करणार नाही. पण माधुरी अनिल कपूर संदर्भात असं नेमकं का म्हणाली होती,चला जाणून घेऊया सविस्तर.(When Madhuri Dixit said she would never marry Anil Kapoor)

माधुरी दिक्षित आणि अनिल कपूर पहिल्यांदा दिग्दर्शक प्रयाग राज यांच्या 'हिफाजत' सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघांनी एकत्र कितीतरी हिट सिनेमे दिले. यामध्ये 'तेजाब','बेटा','खेल','परिंदा'... अशा कितीतरी सिनेमांची नावे घेता येतील. ते दोघे काही दिवसांपूर्वी 'टोटल धमाल' सिनेमात एकत्र दिसले होते,जो सिनेमा २०१९ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

Anil Kapoor With WIfe Sunita Kapoor

३३ वर्षापूर्वी १९८९ साली जेव्हा माधुरीला विचालं गेलं होतं की ती आपला सहकलाकार अनिल कपूरशी लग्न करेल का? तेव्हा तिनं मजेत म्हटलं होतं,''नाही, मी तोच काय,त्याच्यासारख्या कुणाशीच लग्न करणार नाही. पहिली गोष्ट तो खूपच हळव्या मनाचा आहे. मला माझा नवरा शांत स्वभावाचा हवा आहे. जो अनिलचा स्वभाव नाही. मी अनिल सोबत खूप सिनेमे केलेयत म्हणून मी त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल आहे. मी आमच्या अफेअरच्या अफवांवर देखील त्याची मस्करी करू शकते,पण लग्न नो वे..''

अनिल कपूरनी १९८४ मध्ये सुनिता कपूरसोबत लग्न केलं होतं. त्यांना तीन मुलं आहेत-सोनम कपूर,रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर. अनिल कपूर आता लवकरच आजोबा देखील बनणार आहे. त्यांची मोठी मुलगी सोनम कपूर प्रेग्नेंट आहे आणि लवकरच आपल्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. सोनम कपूरने २०१८ मध्ये आपला बॉयफ्रेंड आनंद अहूजा सोबत लग्नगाठ बांधली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT