When Shah Rukh Khan's gesture made Sham Kaushal And his family emotional
When Shah Rukh Khan's gesture made Sham Kaushal And his family emotional Google
मनोरंजन

'शाहरुखकडून 'हे' आधी शिकून घ्या...'; बॉलीवूडला विकी कौशलच्या वडीलांचा सल्ला

प्रणाली मोरे

Shahrukh Khan: काही दिवसांपूर्वी पर्यंत जे लोक शाहरुखच्या(Shahrukh Khan) कमबॅकची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते,तेच लोक आता त्याच्या सिनेमांना बॉयकॉट करण्याची मागणी करताना दिसत आहेत. नुकतंच ट्वीटरवर नेटकऱ्यांनी शाहरुखचा आगामी सिनेमा 'पठाण'ला बॉयकॉट(Boycott) करण्याची मागणी केली होती. आता हे काही पहिल्यांदाच घडत नाहीय, याआधीही कोणत्या ना कोणत्या कारणाने शाहरुखची निंदा करण्यात आली होती. लोक काहीही म्हणोत पण शाहरुखचे चाहते आणि त्याच्या निकटवर्तीयांना तो नेहमीच खास राहणार आहे. तो ज्या पद्धतीनं सगळ्यांचा मान राखतो यामुळे तर तो सगळ्यांचाच फेव्हरेट आहे. शाहरुखशी संबंधित असाच एक किस्सा विकी कौशलचे वडील(Vicky Kaushal's father) स्टंट मास्टर शाम कौशल(Sham Kaushal) यांनी शेअर केला आहे.(When Shah Rukh Khan's gesture made Sham Kaushal And his family emotional)

शाम कोशल यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की,''शाहरुखने ज्या पद्धतीनं त्यांना,त्यांची पत्नी आणि मुलगा विकी कौशलला वागणूक दिली होती,त्यांचा मान राखला होता,ते पाहून आपण भावूक झालो होतो''. शाम कौशल,शाहरुखसोबत गेल्या २१ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी 'अशोका' ते 'ओम शांति ओम' पर्यंतच्या शाहरुखच्या अनेक सिनेमांसाठी स्टंट मास्टर म्हणून काम केले आहे. शाम कौशल यांनी शाहरुखच्या कामाप्रतीच्या निष्ठेविषयी बोलताना त्याची तोंडभरून प्रशंसा केली. तो कसा टीममधील प्रत्येकाला मान देतो आणि प्रेम देतो याविषयी देखील त्यांनी सांगितले.

२०१९ मधील फिल्मफेअर अॅवॉर्ड्सचा एक किस्सा सांगताना श्याम कौशल म्हणाले, ''कोणत्या व्यक्तीचा मान कसा राखायला हवा हे बॉलीवूडनं शाहरुख कडून शिकायला हवं. शाहरुख जसा तुमच्याशी वागतो,बोलतो,मान देतो हे पाहून प्रत्येकजण धन्य होतो. आमच्यामध्ये आजही तसंच नातं आहे जे अशोकाच्या वेळेला होतं. आम्ही भेटलो की पंजाबी भाषेतच बोलतो. २०१९ चा फिल्मफेअर शो शाहरुख खान आणि विकी होस्ट करत होते. मी जर कुठल्या अॅवॉर्ड फंक्शनला गेलो तर जिथे बसायला सांगतात तिथे बसतो. मी त्या अॅवॉर्ड शो ला फक्त विकी होस्ट करत आहे म्हणून गेलो होतो''.

शाम कौशल पुढे म्हणाले, ''शाहरुख आणि विकी स्टेजवर आले. शाहरुख जे स्क्रिप्टमध्ये नव्हतं ते बोलायला लागला. त्यानं विकीला विचारलं मी कुठे बसलोय? मी माझ्या पत्नीसोबत पाचव्या की सहाव्या रांगेत बसलो होतो. शाहरुखनं ते विचारल्या बरोबर सगळे कॅमेरे आमच्यावर...शाहरुख विकीला म्हणाला, जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होतो तेव्हा तुझ्या वडीलांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. शाहरुखनं सगळ्यांसमोर माझ्याविषयी खूप गोष्टी बोलून दाखवल्या. सगळे आमच्याकडेच पाहत होते. मी इतका भावूक झालो होतो की मला वाटलं मी आता रडेन. मला खूप पारितोषिकं मिळाली पण २०१९ चा तो फिल्मफेअर अॅवॉर्ड शो माझ्यासाठी खास आहे. जेव्हा मी विकीला नंतर विचारलं की शाहरुख जे बोलला ते स्क्रिप्टमध्ये होतं का? तेव्हा विकी म्हणाला,नाही. विकी पुढे मला म्हणाला की, पण शाहरुख मला व्हॅनीटमध्ये विचारत होता,'श्यामजी आलेत का? तुझी आई पण आलीय का? त्यांचे नाव काय आहे?' आणि ते ऐकून मला परत गदगदून आलं''.

श्याम कौशल पुढे म्हणाले,''याच गोष्टी शाहरुखला मोठं बनवतात''. ते म्हणाले, ''मी माझ्या मुलांना म्हणालो की यातून खूप शिकण्यासारखं आहे, जेव्हा जेव्हा मी कुठल्या अॅवॉर्ड शो ला गेलोय,आणि शाहरुख भेटला तेव्हा तेव्हा त्यानं माझ्याविषयी खूप चांगल्या गोष्टी कुटुंबाशी शेअर केल्या. आणि हे माझ्यासाठी मोठं अॅवॉर्ड आहे''.

शाम कौशल यांनी शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम'चा एक किस्सा देखील शेअर केला. ते म्हणाले,''त्या सिनेमात एक आगीचा सीन होता. सीननुसार,सगळ्या पडद्यांना आग लागलेली असते. तेव्हा तिथे तीन कॅमेरे, कलाकर आणि युनिट मिळून १२५ लोक होते''. शाम कौशल पुढे म्हणाले,''ते खूप घाबरले होते की शाहरुख तो सीन करणार होता. पण शाहरुख म्हणाला, काही होणार नाही पाजी. मी निघून जाईन इथून बरोबर. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी शाहरुखला सच्चा पठाण मानतो. भीती नावाची कोणती गोष्टच त्याच्यात नाहीय, तो अभिनयाला पुजणारा अभिनेता आहे. झोकून देऊन काम करणं त्याच्याकडून शिकावं''.

शाहरुख खान आता लवकरच 'पठाण' आणि 'जवान' सिनेमात दिसणार आहे. नुकताच तो आर.माधवनच्या 'रॉकेट्री-द नांबी इफेक्ट' आणि 'लाल सिंग चड्ढा'त कॅमियो साकारताना दिसला होता. याआधी शाहरुख २०१८ मध्ये 'झीरो' सिनेमात दिसला होता. आता तब्बल ५ वर्षांनी शाहरुखला पडद्यावर पहायला त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT