karan johar 
मनोरंजन

"करण जोहरचं होतं माझ्यावर प्रेम"; अभिनेत्रीचा खुलासा 

स्वाती वेमूल

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे एकमेकांना लहानपणापासून किंवा शालेय जीवनापासून ओळखतात. काहींमध्ये घट्ट मैत्री झाली तर काहींच्या नात्यात प्रेमाची कळी उमलली. एकतर्फी प्रेमाचेही बरेच किस्से इंडस्ट्रीत ऐकायला मिळतात. असाच एका किस्सा समोर आला आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने एका अभिनेत्रीला प्रेमाची कबुली दिली होती. त्या अभिनेत्रीने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला. ती अभिनेत्री आहे ट्विंकल खन्ना. करण आणि ट्विंकल एकमेकांना लहानपणापासूनच ओळखतात आणि आताही या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. मात्र एकेकाळी करण ट्विंकलच्या प्रेमात होता आणि त्याने स्वत:हून तिच्याकडे प्रेमाची कबुली दिली होती. 

२०१५ मध्ये ट्विंकलच्या पहिल्या पुस्तकाचा अनावरण सोहळा पार पडला होता. त्यावेळी ट्विंकलने करणविषयी सांगितलं होतं. करणचं माझ्यावर प्रेम होतं, असं ती म्हणाली. त्याला करणनेही दुजोरा दिला. या मुलाखतीत ट्विंकलने करणच्या बोर्डिंग स्कूलमधलाही किस्सा सांगितला. करणने एकदा बोर्डिंग स्कूलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण गेटच्या बाहेर पडण्याआधीच त्याला पकडलं गेलं होतं, असं तिने सांगितलं. 

'कुछ कुछ होता है' हा दिग्दर्शक म्हणून करण जोहरचा पहिलाच चित्रपट होता. या पहिल्या चित्रपटातील टीनाच्या भूमिकेसाठी त्याला ट्विंकल खन्नाला घ्यायचं होतं. मात्र ट्विंकलने नकार दिल्यामुळे ती भूमिका अभिनेत्री राणी मुखर्जीला मिळाली. करणचा हा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आजही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT