Salman Khan, Akshay Kumar Google
मनोरंजन

'अतरंगी रे' सिनेमासाठी अक्षय कुमारवर आली सलमानची मनधरणी करायची वेळ

आनंद एल राय यांनी सांगितली पडद्यामागची खरी गोष्ट

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये सलमान खान नावाचा एक दबदबा आहे हे आता वेगळं सांगायला नको. सलमाननं इथे अनेकांचं करिअर घडवलंय तर अनेकांना बॉलीवूडमधनं पळवलंयही. आता यामध्ये विवेक ओबरॉयचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. बरं ही लिस्ट तशी मोठी आहे पण ऐश्वर्या रायमुळे सलमान- विवेक ओबेरॉय मधला वाद पटकन डोळ्यासमोर येतो. विवेकने सलमानशी घेतलेला पंगा त्याला चांगलाच महाग पडला हे त्याच्यामध्ये चांगला कलाकार बनण्याची क्षमता असूनही तो का मागे पडला यावरनं प्रकर्षानं लक्षात येतं. असो...आता हे सगळं पुन्हा सांगण्याचं कारण हेच की नुकताच बॉलीवूडचा खिलाडी अक्षयच्या 'अतरंगी रे' सिनेमाचाही सलमानशी पाला पडला होता. पण 'अतरंगी रे' चं भाग्य की सलमानच्या वक्र दृष्टीतनं तो वाचला. चला जाणून घेऊया नेमकं 'अतरंगी रे' विरुद्ध 'सलमान'मध्ये काय घडलं होतं ते.

अतरंगी रे सिनेमाची ब-याच दिवसांपासून चर्चा आहे. अखेर सिनेमा या महिन्यात २४डिसेंबरला डिस्ने+हॉटस्टारवर प्रदर्शित होतोय. आनंद एल राय. दिग्दर्शित या सिनेमात अक्षय कुमार,सारा अली खान आणि साऊथ स्टार धनुष महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमाला ए.आर,रहमान यांनी संगीत दिलंय. सिनेमातलं सारा वर चित्रित केलेलं 'हाय चका चक' हे गाणं सध्या तुफान गायजतंय. साराही या गाण्याचं सोशल मीडियावर मोठमोठ्या कलाकारांकडून डान्स करवून घेत जोरदार प्रमोशन करण्यात बिझी आहे. नुकतंच सिनेमाच्या म्युझिक रिलीजच्या निमित्तानं सिनेमाची टीम एकत्र आली होती. तेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी सिनेमाच्या नावावरनं घडलेली एक गोष्ट जी वादाच्या भोव-यात सापडता सापडता वाचली ती सगळ्यांसमोर शेअर केली. बरं नावामुळे पंगाही कोणाशी तो दबंग खानशी. काय घडलं होतं सिनेमाच्या नावावरनं?

आनंद एल राय म्हणाले की,''आम्ही खूप आधी आमच्या सिनेमाचं 'अतरंगी रे' हे नाव पक्क केलं होतं. पण जेव्हा नावासाठी रजिस्ट्रशन करायला गेलो तेव्हा कळाले की ते नाव आधीपासनंच सलमान खानने रजिस्टर केले आहे. आता काय करायचं हा मुद्दा समोर उभा राहिला. तेव्हा मी सलमानशी बोलायचं ठरवलं. अर्थातच सलमान नाही बोलला असता तर नाव बदलावे लागले असते. पण सलमान माणूस म्हणून खरंतर खूप चांगला आहे,सपोर्टिव्ह आहे,त्यामुळे त्याला जेव्हा मी सांगितलं की हे नाव माझ्या मनात आधीपासून होते. तेव्हा तो म्हणाला,''मग प्रश्नच उरत नाही. तू ते नाव तुझ्या सिनेमासाठी घेऊ शकतोस''. आणि अशात-हेने 'अतंरगी रे' नाव आम्हाला सिनेमासाठी सलमानमुळे मिळाले. त्यासाठी मी त्याचा कायम आभारी राहीन.''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT