Shehnaaz Gill News 
मनोरंजन

सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज माध्यमांसमोर ढसाढसा रडली

व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा हळहळले.

सकाळ डिजिटल टीम

काही महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं Siddharth Shukla निधन झालं. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची मैत्रीण शहनाज गिल Shehnaaz Gill पूर्णपणे खचली होती. बिग बॉस १३ मध्ये शहनाज आणि सिद्धार्थला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं होतं. त्या दोघांनी म्युझिक अल्बममध्येही एकत्र काम केलं होतं. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजने काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र त्याचदरम्यान तिचा 'हौंसला रख' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. म्हणून तिला प्रमोशननिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये हजर राहावं लागलं. अशाच एका कार्यक्रमात शहनाज सिद्धार्थच्या आठवणीत भावूक झाली. शहनाजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Shehnaaz Gill breaks down remembering sidharth sidharth shukla)

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज काही काळ सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. नुकतीच ती दिलजीत दोसांझसोबत ‘हौसला रख’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली. प्रमोशनच्या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये तिला सिद्धार्थच्या आठवणीत रडू कोसळल्याचं पहायला मिळतंय. हा व्हिडीओ पाहून 'सिडनाज'चे चाहतेसुद्धा हळहळले. चाहत्यांनीच या जोडीला 'सिडनाज' असं नाव दिलं होतं. काही दिवसांपूर्वी तिने सिद्धार्थसाठी ‘तू यहीं है’ हे गाणं समर्पित केलं होतं. या गाण्यात सिद्धार्थच्या अनेक आठवणी पुन्हा एकदा चाहत्यांना पहायला मिळाल्या होत्या.

बिग बॉस'च्या घरात सिद्धार्थ आणि शहनाज या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या मैत्रीची सतत सोशल मीडियावर चर्चा होत असे. सिद्धार्थ-शहनाजच्या चाहत्यांमध्ये #sidnazz हा हॅशटॅग प्रसिद्ध आहे. सिद्धार्थने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'जाने पहचाने से.. ये अजनबी', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. मात्र 'बालिका वधू' या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT