who give baipan bhaari deva movie title director kedar shinde revealed SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव कोणी सुचवलं? दिग्दर्शक केदार शिंदेंनीच केला खुलासा

बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतं. त्याचं working title होतं "मंगळागौर"

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva News: बाईपण भारी देवा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सिनेमा पहायला केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही गर्दी केली.

बाईपण भारी देवा बॉक्स ऑफीसवर लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांची गर्दी खेचण्यात यशस्वी झालाय. सिनेमाचं नाव एकदम भारी आहे.

पण हे नाव कोणी दिलंय, यामागे एक महत्वाचा खुलासा झालाय. बाईपण भारी देवा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनीच या गोष्टीचा खुलासा केलाय.

(who give baipan bhaari deva movie title director kedar shinde revealed)

बाईपण भारी देवा सिनेमाचं नाव आधी मंगळागौर होतं. सिनेमाची स्क्रिप्ट जेव्हा कलाकारांना देण्यात आली तेव्हा त्यावर मंगळागौर लिहीलं होतं.

पण नंतर मात्र हे नाव बदलुन बाईपण भारी देवा हे नाव देण्यात आलं. हे नाव कोणी सुचवलं याचा खुलासा खुद्द केदार शिंदेंनीच केलाय.

केदार शिंदेंनी पोस्ट करत लिहीलंय की... बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतं. त्याचं working title होतं "मंगळागौर". \

ते बदलण्याचा विचार जेव्हा आला तेव्हा, अजित भुरे यांनी सुचवलं की, गाण्याची catch line जी आहे ती ठेवली तर? बाईपण भारी देवा याचं credit पुर्ण वलय मुळगुंद या गीतकाराचं आहे. ते गाणं त्याने फारच अप्रतिम लिहिलं आहे.

केदार शिंदे शेवटी लिहीतात... स्त्री केंद्रस्थानी ठेवून तीच्या भावभावना उत्तम मांडल्या आहेत. आणि ती शेवटची कविता!!! माझी मैत्रीण @ashwinithepoem त्यावेळी मदतीला धावून आली. या सिनेमाचा शेवट वेगळा होता.

पण मंगळागौर गाणं संपल्यावर एवढ्या उंचीवर गेल्यानंतर पुन्हा कुठला सीन करणं जड जाणार होतं. ही कवितेची आयडिया डोक्यात आली.

संपुर्ण सिनेमाचा सार व्यक्त करणारी ती कविता अश्विनीने लिहिली. या प्रवासात असंख्य माणसं महत्वाची ठरली. कोटीची उड्डाणं करणारा हा सिनेमा तयार होताना ही मंडळी विसरून चालणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

SCROLL FOR NEXT