who is sana javed pakistan actress shoaib malik second wife sania mirza divorce rumor  SAKAL
मनोरंजन

Shoaib Malik - Sana Javed: शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली ती सना जावेद आहे तरी कोण?

Shoaib Malik Wedding: कोण आहे शोएबची बायको सना जावेद?

Devendra Jadhav

Who is Sana Javed: गेल्या अनेक दिवसांपासून शोएब मलिक - सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अशातच शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चांना एकच उधाण आलं.

शोएबने अभिनेत्री सना जावेदसोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे रोमँटिक फोटो चांगलेच व्हायरल झाले. कोण आहे सना जावेद? आम्ही सांगतो.

कोण आहे सना जावेद?

सना जावेदचा जन्म 25 मार्च 1993 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पाकिस्तानी कुटुंबात झाला होता. जेद्दाहमधील पाकिस्तान इंटरनॅशनल स्कूलमधून शाळा आणि महाविद्यालय पूर्ण केल्यानंतर, ती तिच्या कुटुंबासह कराचीला गेली. आणि नंतर कराची विद्यापीठातूनतिने पदवी प्राप्त केली.

ऑक्टोबर 2020 मध्ये, तिने कराची येथील तिच्या घरी एका खाजगी निकाह समारंभात गायक उमेर जसवालशी लग्न केले. पुढे दोघांचा घटस्फोट झाला असल्याची चर्चा आहे.

सनाबद्दल आणखी सांगायचं झालं तर.. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली. पुढे २०१२ मध्ये अभिनयात पदार्पण केल्यानंतर तिने 'प्यारे अफझल' या टीव्ही मालिकेतील भूमिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळवली.

सनाच्या वागण्यावर अधूनमधून टीका होत असतानाही शोएब मलिकने अनेकदा तिचा बचाव केला. सनाने अनेक पाकिस्तानी टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. याशिवाय मॉडेलिंग करिअरमध्ये सनाने तिची छाप पाडली असून विविध पुरस्कार पटकावले आहेत.

१९ जानेवारीला सनाने शोएबसोबत दुसरं लग्न केलं.

शोएब - सनाचे लग्न

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक विवाहबंधनात अडकला आहे. शनिवारी सकाळी त्याने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले.

शोएब मलिकने याआधी भारताची टेनिसपटू सानिया मिर्झासोबत लग्न केले होते. मात्र काही दिवसाआधी दोघेही वेगळे झाले अशा बातम्या येत होत्या, आता या दरम्यान शोएब मलिकच्या लग्नाची बातमी समोर आल्याने चर्चांना उधाण आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: संजू सॅमसनने शेवटची संधीही गमावली, घरच्या मैदानातही स्वस्तात आऊट

Latest Marathi News Live Update: नववर्षाच्या रात्रीच्या चर्चित जान्हवी कुकरेजा हत्याकांडाचा निकाल

Tax-Free Nations : कराच्या स्वरूपात ‘या’ देशांमध्ये जनतेकडून एकही रुपया केला जात नाही वसूल!

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या निर्मिती सावंत झाल्या आजी; नात की नातू? स्वतः केला खुलासा

Raj Thackeray Tweet on NCP President Post : ‘’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण..’’ ; राज ठाकरेंच्या ट्वीटने खळबळ

SCROLL FOR NEXT