Oscar 2024 Latest News esakal
मनोरंजन

Oscar 2024 Updates : तब्बल १३ नामांकन असणारा 'ओपनहायमर' की 'पुअर थिंग्ज', कोण मारणार बाजी? 'ऑस्कर'ची उत्सुकता शिगेला!

यंदाचा ऑस्कर हा (Oscar 2024 Updates) अनेक गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरताना दिसणार आहे. ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Oscar 2024 Latest Updates : जगप्रसिद्ध ऑस्कर सोहळ्याच्या वितरणाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असताना आता त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यंदाच्या वर्षी कुणाला सर्वाधिक ऑस्कर मिळणार, कुणाची सरशी होणार याची चाहत्यांना, सिनेप्रेमींना कमालीची उत्सुकता आहे. या वर्षी प्रख्यात दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलानचा ओपनहायमर हा सर्वाधिक १३ नामांकन मिळून आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

नोलानच्या ओपनहायमरनं गेल्या वर्षी जी क्रेझ तयार केली होती त्याची चर्चा अद्याप कायम आहे. तो चित्रपट, त्याचा विषय, त्याचं स्क्रिप्टिंग, त्याच्या दिग्दर्शनाची अन् सिनेमॅटोग्राफीची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. एडिटिंग,ग्राफीक्स अन् स्टोरीसाठी देखील त्याचेच नाव आहे. अशावेळी या चित्रपटाला कडक टक्कर देण्यासाठी पुअर थिंग्जही मैदानात आहे. या चित्रपटाला ११ नामांकनं मिळाली आहेत. बार्बीचीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. पण ग्रॅमीनंतर हा चित्रपट थोडा मागे पडल्याचे बोलले जाते.

यंदाचा ऑस्कर सोहळा प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही स्टार जीमी किमेल होस्ट करणार आहे. लॉस एंजेलिस मध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्याला हॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटी सहभागी होणार आहेत. यावेळी भारतातील प्रेक्षकांना उद्या (सोमवार) पहाटे चार वाजल्यापासून हा सोहळा पाहता येणार आहे. या सोहळ्यामध्ये सर्वाधिक चर्चा ही नोलानच्या ओपनहायमरची चर्चा आहे. त्यानंतर किलर्स ऑफ द फ्लॉवर मुनविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिनी स्कॉर्सेसी यांच्या किलर्स ऑफ द फ्लॉवर ला देखील १० नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळे नोलान अन् स्कॉर्सेसी यांच्यात देखील जोरदार लढत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. स्कॉर्सेसी यांच्यासह आणखी तीन दिग्दर्शक हे यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात नामांकन मिळालेले सर्वाधिक वयस्कर सेलिब्रेटी ठरले आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर, ज्योडी फोस्टर, इमा स्टोन, रायन गोसलिंग, रॉबर्ट डी निरो आणि ब्रॅडली कूपर यांच्या नावाचा समावेश आहे.

समीक्षक, चाहत्यांचे काय आहे म्हणणे?

यंदाच्या ऑस्करवर ख्रिस्तोफर नोलानच्या ओपनहायमरचे वर्चस्व राहिल असे अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांपासून नोलानला ऑस्करनं दिलेली हुलकावणी या वर्षी मात्र त्याच्या हातात अनेक ऑस्करच्या ट्रॉफीज येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये नोलानच्या ओपनहायमरला १३ नामांकनं मिळाली आहेत.

अशी आहेत नामांकन....

१. बेस्ट पिक्चर..

अमेरिकन फिक्शन (American Fiction), अॅनाटॉमी ऑफ फॉल (Anatomy of a Fall), बार्बी (Barbie), द होल्डओव्हर्स (The Holdovers), किलर्स ऑफ द फ्लॉवर मुन (Killers of the Flower Moon), मास्टर्रो (Maestro), ओपनहायमर (Oppenheimer), पास्ट लिव्हज (Past Lives), पुअर थिंग्ज (Poor Things) आणि द झोन ऑफ इंटरेस्ट (The Zone of Interest)

२. सर्वोत्कृष्ट अभिनय - मुख्य भूमिका

ब्रॅडली कूपर (Bradley Cooper), कोलमन (Colman Domingo), पॉल गियामट्टी (Paul Giamatti), सिलियन मर्फी (Cillian Murphy), जेफ्री राईट (Jeffrey Wright)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Nepal Violence: 'जेन-झीं'नी निवडला देशाचा नेता! माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे नेतृत्वाची धुरा

Jalna News : समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने ‘ठोकले खिळे’ सोशल मीडिया व प्रसार माध्यमावर व्हिडीओ व्हायरल मुळे खळबळ

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT