Why Aaradhya Angry At Media? Abhishek And Aishwarya Can't Even Handle her,Watch Video Instagram
मनोरंजन

Viral Video: Aaradhya Bachchan मुळे ऐश्वर्या-अभिषेकची पंचाईत, मीडियासमोरच..

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बी-टाऊनची सर्वात लोकप्रिय स्टार डॉटर्स आहे,सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते.

प्रणाली मोरे

(Aishwarya Rai-bachchan)ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) यांची मुलगी आराध्या(Aaradhya) बीटाऊनची सर्वात लोकप्रिय स्टार डॉटर्स आहे असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. आराध्या आता खूप लहान आहे पण तरिही तिचा फॅन फॉलॉइंग मात्र जबरदस्त आहे. आराध्या गेल्या काही दिवसांपासून आपल्या चांगल्या उंचीमुळे चर्चेत आहे. आता या स्टार डॉटरचा एक थ्रोबॅक व्हिडीओ(Video) आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या व्हिडीओतील आराध्याचे हावभाव पाहून सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळतील. पण तिचे हे भाव रुसव्या-फुगव्याचे आहेत बरं का.(Why Aaradhya Angry At Media? Abhishek And Aishwarya Can't Even Handle her,Watch Video)

ऐश्वर्या कुठेही आराध्यासोबत दिसली की नेहमीच तिचा हात हातात पकडून चालते. मग अगदी एअरपोर्ट असो की कुठलाही कार्यक्रम. या थ्रोबॅक व्हिडीओविषयी बोलायचं झालं तर आराध्या यामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत कुणा मित्राच्या लग्नाला गेलेली दिसत आहे. आणि त्यावेळी फोटोसाठी पापाराझी मागे लागल्यामुळे आराध्या भलतीच वैतागलेली दिसत आहे.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकाल की आराध्या इतर सेलिब्रिटींसारखेच लेफ्ट-राइट करत फोटो पोझ देताना दिसत आहे,पण हे सगळं करताना ती इतकं थकते की रागाने डोळे मोठे करत पापाराझीकडे पाहते. आता आराध्याला तसं करु नकोस म्हणून आवरताना ऐश्वर्या-अभिषेकची देखील पंचाईत झालेली दिसतेय. पण मीडिया समोर असल्यानं ते अगदीच सबुरीनं घेताना दिसत आहेत. आराध्याचा हा व्हिडीओ खरंतर खूप जुना आहे. हो,पण या व्हिडीओला पाहिल्यावर लक्षात येतंय की ऐश्वर्यानं लहानपणापासूनच आराध्याला पापाराझी सोबत डील करणं शिकवत आहे.

काही दिवसांपूर्वी कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील आराध्याचे ऐश्वर्या-अभिषेक सोबतचे फोटो समोर आले होते. हे फोटो समोर आल्यानंतर आराध्या बच्चनची उंची हा एक विषय बनून चर्चेत आला. त्याचं झालं असं की, या फोटोमधून आराध्या खूपच मोठी दिसत आहे. उंचीमध्ये आराध्या वयाच्या १० व्या वर्षी आपल्या आईच्या कानापेक्षा वर पोहोचलेली दिसतेय. एवढंच नाही तर यातील इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की ऐश्वर्याने हाय हिल्स घातल्या आहेत आणि आराध्यानं फ्लॅट तरी देखील ती आई बरोबर असताना उंचच दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मतमोजणी सुरू... नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी लोकांचा उत्साह, प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा

जालन्यात काँग्रेस नेत्याच्या पुतण्यानं संपवलं आयुष्य, कारमध्ये गोळी झाडून घेतली

Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

Winter Depression Diet: हिवाळ्यात सतत उदास वाटतंय? ‘हे’ पदार्थ खाल्ल्यावर मूड अन् आरोग्य दोन्ही राहील हेल्दी

Bachchu Kadu: बच्चू कडू यांनी मिंथुरला भेट देत पीडित रोशनला दिला धीर; किडनी विकली गेली तरी सरकार गप्प का?

SCROLL FOR NEXT