abhishek bachchan and karisma kapoor 
मनोरंजन

'या' कारणामुळे अभिषेक-करिश्माचं होऊ शकलं नाही लग्न

स्वाती वेमूल

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांची लव्हस्टोरी, ब्रेकअप, आवडीनिवडी याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा होतच असते. अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची लव्हस्टोरी अनेकांना ठाऊक आहे. एकेकाळी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. इतकंच नव्हे तर या दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र अभिषेक-करिश्माच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. 

अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा पार पडला होता. दोघांच्या लग्नाच्या पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. मात्र ऐनवेळी हा साखरपुडा मोडण्यात आला. यामागचं कारण अभिषेकची आई जया बच्चन होत्या असं म्हटलं जातं. २००२ साली अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशीच अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा करण्यात आला होता. पण आपल्या सुनेने लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करू नये अशी जया बच्चन यांची इच्छा होती. मात्र करिश्माला लग्नानंतरही चित्रपटसृष्टीत काम करायचं होतं. 

जया बच्चन यांच्या मागणीमुळे करिश्मा आणि त्यांच्या मतभेद निर्माण झाले आणि याच कारणामुळे दोन्ही कुटुंबातील संबंध बिघडले. परिणामी, हा साखरपुडा मोडण्यात आला. त्यानंतर करिश्माने २००३ मध्ये संजय कपूरसोबत लग्न केलं. तर अभिषेकने २००७ मध्ये ऐश्वर्या रायशी लग्नगाठ बांधली. करिश्माने १३ वर्षांच्या संसारानंतर संजय कपूरला घटस्फोट दिला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT