Mahesh Manjrekar  Instagram
मनोरंजन

महेश मांजरेकर यांनी 'बिग बॉस मराठी ३'मधून का घेतली माघार?

'बिग बॉस मराठी ३'चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांत पार पडणार आहे.

स्वाती वेमूल

कलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस मराठी ३' (Bigg Boss Marathi 3) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. मात्र अवघ्या काही दिवसांत हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरातील सात स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. त्यापैकी एक जण बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. अशातच या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी माघार घेतल्याचं कळतंय. ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर असताना महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता सिद्धार्थ जाधवकडे सोपवली आहे. त्यामुळे नेमकं काय झालंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनपासून महेश मांजरेकर सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या सूत्रसंचालनाची स्टाइल प्रेक्षकांना फारच आवडते. चावडीच्या एपिसोड्समध्ये ते प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात तर स्पर्धकांनाही योग्य दिशा दाखवतात. गेल्या आठवड्यात मांजरेकर यांनी सिद्धार्थकडे सूत्रसंचालन सोपवल्याने आता ते पुन्हा दिसणार की नाही, अशी चर्चा होत आहे. महेश मांजरेकर यांनी तब्येतीच्या कारणास्तव शोमधून माघार घेतल्याचंही म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया पार पडली होती.

'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार येत्या २६ डिसेंबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोचे निर्माते सध्या ग्रँड फिनालेसाठी जोरदार तयारी करत आहेत. या सिझनच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना एक छोटासा बदलसुद्धा पहायला मिळणार आहे. पहिल्या दोन सिझनमध्ये पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. मात्र यंदाच्या सिझनमध्ये पाच नव्हे तर सहा स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंतचा प्रवास करणार असल्याचं कळतंय. २७ डिसेंबरपासून बिग बॉस मराठी ३च्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित होणार असून या मालिकेद्वारे अभिनेत्री भार्गवी चिरमुले छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT