dilip prabhavalkar 
मनोरंजन

'तात्या विंचू'साठी दिलीप प्रभावळकरच का?

महेश कोठारे यांनी सांगितला किस्सा

स्वाती वेमूल

काही मराठी चित्रपट आणि त्यातील पात्रं ही वर्षानुवर्षे प्रेक्षकांना लक्षात राहतात. चित्रपटांमधील नायक विशेषकरून जरी प्रेक्षकांची मनं जिंकत असली तरी काही खलनायकसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून जातात. अशीच एक भूमिका म्हणजे 'तात्या विंचू' Tatya Vinchu. महेश कोठारे Mahesh Kothare दिग्दर्शित 'झपाटलेला' या चित्रपटातील 'तात्या विंचू' हे पात्रं खूप गाजलं. कोणत्याही मराठी रसिकाला हे पात्र विसरणं शक्य नाही. ही भूमिका अभिनेते दिलीप प्रभावळकर Dilip Prabhavalkar यांनी साकारली होती. प्रेक्षकांनी पहिल्यांदाच दिलीप प्रभावळकर यांना अशा रुपात पाहिलं होतं. तात्या विंचूच्या भूमिकेसाठी त्यांचीच निवड का करण्यात आली, यामागचं कारण महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

'तात्या विंचू'साठी दिलीप प्रभावळकर का?

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे म्हणाले, "कुठल्याही चित्रपटात दमदार कलाकारांची निवड करणं म्हणजे अर्ध युद्ध जिंकल्यासारखंच आहे. चित्रपटात कास्टिंग परफेक्ट असणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि भन्नाट कास्टिंग करणं यात एक वेगळीच मजा असते. व्हिलनच्या रोलमध्ये दिलीप प्रभावळकर आणणं हा एक भन्नाट विचार होता. लेखक अशोक पाटोळे आणि मी ठरवून दिलीप प्रभावळकरांकडे गेलो आणि त्यांना भूमिका समजावून सांगितली. त्यांनासुद्धा चौकटीबाहेरच्या भूमिका साकारायला खूप आवडतं. तात्या विंचूची कल्पना त्यांनाही खूप आवडली. मी त्यांचा दात लावलेला गेटअप कुठेतरी पाहिला होता, म्हणून मी त्यांना सांगितलं की ते दात लावून केलं तर अजून छान वाटेल. त्यांनी स्वत:हून ती कवळी बनवून घेतली आणि सर्व तयारी केली. तात्या विंचूचं श्रेय दिलीप प्रभावकरांचं आणि लेखक अशोक पाटोळे यांचं आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT