kriti and sophie giving major fitness goals
kriti and sophie giving major fitness goals  
मनोरंजन

सोफी चौधरी आणि क्रिती सॅनन देत आहेत एकमेकांना खुन्नस कारण...

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या फिटनेसमुळे ओळखले जातात.  फिटनेमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. शिवाय बॉलिवूडमध्ये फिटनेसला सर्वाधिक महत्त्व असल्याने सर्वच कलाकार फिट राहण्याच्या शर्यतीत दिसतात. फिटनेससाठी खासकरुन ओळखले जाणारे कलाकार म्हणजे मलायका अरोरा, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, शिल्पा शेट्टी, जॉन अब्राहिम, सलमान खान आणि असे अनेक कलाकार आहेत जे फिटनेससाठी ओळखले जातात. मॉडेल आणि 'वर्क इट अप' शोची होस्ट सोफी चौधरीही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अभिनेत्री क्रिती सॅननसोबत नुकत्याच तिचा चिट चॅट शो पार पडला. या शोदरम्यान सोफियाने खुलासा केला की तिला क्रितीची एक गोष्ट अजिबात आवडत नाही. 

'वूट' अॅपच्या 'वर्क इट अप' या फिटनेसविषयीच्या कार्यक्रमात क्रिती सॅनन चिट चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. कार्यक्रमादरम्यान क्रितीने फिटनेसचे अनेक सिक्रेट शेअर केले. आपल्या फिटनेसविषयीही तिने अनेक टिप्स शेअर केल्या.सोफी चौधरीने शो होस्ट केला. शिवाय फिटनेस इन्स्ट्रक्टर यासमिन कराचीवालासोबत सोफी आणि क्रितीने थोडा व्यायामही केला.

या शोदरम्यान सोफियाने क्रितीला तिच्या फिटनेस प्रेरणेविषयी विचारले असता 'गाजराचा हलवा' असं उत्तर तिने दिलं. त्यावर  त्वेषाने  सोफी म्हणाली,' बघ.. हेच मला तुझ्याबाबतीत आवडत नाही. जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले होते तेव्हा तू जिमसाठी आली होतीस. पण, वजन कमी करण्यासाठी नाही तर उलट वाढविण्यासाठी. नाहीतर लोकं जिममध्ये सहसा वजन कमी करण्यासाठी येतात'. सोफीच्या या उत्तरावर क्रितीने सहमती दिली.

फिटनेसची चर्चा पुढे नेताना क्रिती म्हणाली,' हाडकुळे असणे चांगलं आहे असं लोकांना वाटतं. पण खरतर ते चांगलं नाही. तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. जेव्हा मी वर्कआउट करण्यास सुरुवात केली होती तेव्हा मला वजन वाढवायला लागलं होतं.'

क्रितीच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं तर, ती येत्या 25 ऑक्टोबरला 'हाउसफुल 4' या चित्रपटातून प्रेत्रकांच्या भेटीला येणार आहे. याचवर्षी ती 'पानीपत' या ऐतिहासिक चित्रपटातून संजय़ दत्त आणि अर्जुन कपूर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर हे करीत असून रिलिज डेटची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT