Why Eknath Shinde's Shiv Sena? hardeek joshi finally explained the reason SAKAL
मनोरंजन

Hardik Joshi Join Shivsena : एकनाथ शिंदेंचीच शिवसेना का? राणादाने अखेर स्पष्टच केलं कारण

CM Eknath Shinde : हार्दिक जोशीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला याचं कारण सांगीतलंय.

Devendra Jadhav

Hardik Joshi Shivsena News: तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अन्य मराठी कलाकारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.

मराठी कलाकारांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणं ही सर्वांसाठी आश्चर्यकारक गोष्ट होती. अशातच राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला याचं कारण सांगीतलंय.

(Why Eknath Shinde's Shiv Sena? hardeek joshi finally explained the reason)

मिडीयाने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक जोशीने शिवसेनेत प्रवेश का केला याची कारणं सांगीतली आहेत.

हार्दिक म्हणाला, “शिव चित्रपटसेना ही संघटना आज सुरू करण्यात आली. या संघटनेतुन कलाकारांसाठी काम करण्यात येणार आहे. सुशांत शेलार या संघटनेचा अध्यक्ष आहे.

सुशांतच्या मार्फत आम्ही या संघटनेत सामील झालो. प्रत्येकाला वाटत असतं की आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्यातील लोकांना आपण मदत केली पाहिजे पण त्याचा मार्ग सापडत नाही. तो मार्ग आज मला मिळाला आहे असं मला वाटतं.”

हार्दिक पुढे म्हणाला, “कोणत्याही प्रकारचं राजकारण नसणारी ही संघटना आहे. त्यामुळे आम्ही सर्व कलाकार एकत्र येऊन मनोरंजन सृष्टीतील फक्त कलाकार नाही तर जे संपूर्ण युनिट आहे त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आजच आम्ही या संघटनेचा शुभारंभ केला.

हार्दिक शेवटी लिहीतो.. "आता या चित्रपट संघटनेमार्फत आम्ही हळूहळू विविध योजनाही तयार करत जाऊ.

कलाकारांच्या आणि मनोरंजन सृष्टीतील ज्या समस्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा योग्य मार्ग आहे असं मला वाटलं आणि म्हणूनच यात सहभागी झालो.” असा खुलासा हार्दिकने केलाय.

काल गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर अर्थात पाठक बाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

याशिवाय हार्दिक जोशी, अभिनेत्री अदिती सारंगधर, आणि माधव देवचके यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

आता हार्दिक जोशीने सांगीतल्याप्रमाणे या संघटनेच्या माध्यमातुन मराठी कलाकार कोणत्या नवीन उपाययोजना राबवणार हे पाहणं कुतूहलाचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT