aryan khan and jaya bachchan 
मनोरंजन

ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानच्या अटकेनंतर जया बच्चन का होतायत ट्रोल?

ट्विटरवर #JayaBachchan हा हॅशटॅग ट्रेंड होत असून नेटकरी त्यांच्यावर टीका करत आहेत.

स्वाती वेमूल

Drugs Case : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान Aryan Khan याला ड्रग्जप्रकरणी अमलीपदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. आर्यनसह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तीन जणांना सत्र न्यायालयानं उद्यापर्यंत (४ ऑक्टोबर) एनसीबीची कोठडी सुनावली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अभिनेत्री जया बच्चन यांना ट्रोल केलं जात आहे. ट्विटरवर #JayaBachchan हा हॅशटॅग ट्रेंड होत असून नेटकरी त्यांच्या एका वक्तव्यावरून टीका करत आहेत.

जया बच्चन का होत आहेत ट्रोल?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्जचा मुद्दा समोर आला होता. यावरून इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांवर टीका करण्यात आली होती. अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडला गटार म्हटलं होतं. इंडस्ट्रीत काम करणारे ९९ टक्के कलाकार हे ड्रग्जच्या अधीन गेल्याचं तिने म्हटलं होतं. तर भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपचे खासदार रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग्ज तस्करीचा मुद्दा मांडत इंडस्ट्रीवर टीका केली होती. "चित्रपटसृष्टीत ड्रग्जचं व्यसन पसरत आहे. एनसीबी खरोखर चांगलं काम करतंय", असं ते म्हणाले होते. याबद्दल जया बच्चन यांनी राज्यसभेत संताप व्यक्त केला होता. "इंडस्ट्रीतील लोकांना वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता त्याला गटार म्हणतायत. ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात", असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता त्यांना ट्रोल करण्यात येतंय.

कोर्टात नेमकं काय घडलं?

मुंबईतील किला कोर्टात संध्याकाळी सात वाजता सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी कोर्टात शाहरुख खानची मॅनेजर आणि वकील सतीश मानेशिंदे हे उपस्थित होते. यावेळी कोर्टात या प्रकरणी विविध मुद्द्यांवर युक्तीवाद झाला. दरम्यान, एनसीबीच्या वकिलांनी कोर्टाकडे या तिघांना दोन दिवसांची म्हणजेच ५ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी केली. तसेच आर्यनचे वकील मानेशिंदे यांनी आर्यनकडे या पार्टीसाठीचं तिकीट नव्हतं. तो तिथं ड्रग्ज घेण्यासाठी गेला नव्हता असा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं या तिघांना एक दिवसाची म्हणजेच ४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT