raj kapoor and rajiv kapoor 
मनोरंजन

..म्हणून राजीव कपूर आयुष्यभर वडील राज कपूर यांच्यावर होते नाराज

स्वाती वेमूल

दिवंगत अभिनेते राज कपूर यांना बॉलिवूडचे शो मॅन मानले जाते. राज कपूर यांच्यानंतर त्यांची मुलं रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि काही प्रमाणात राजीव कपूर यांनी वडिलांचा वारसा पुढे नेला. रणधीर व ऋषी कपूर यांना त्यांच्या करिअरमध्ये बरंच यश मिळालं. पण त्या तुलनेत राजीव कपूर मागेच राहिले. यासाठी राजीव कपूर त्यांचे वडील राज कपूर यांना जबाबदार मानत. 

राजीव कपूर यांनी 'एक जान है हम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. त्यानंतर 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून वडील राज कपूर यांनी मुलाला पुन्हा लाँच केलं. हा चित्रपट तुफान गाजला. चित्रपटातील राजीव कपूर यांच्या भूमिकेपेक्षा अभिनेत्री मंदाकिनीचीच चर्चा जोरदार झाली होती. धबधब्याखाली मंदाकिनीने दिलेला या चित्रपटातील सीन चांगलाच चर्चेत राहिला. चित्रपट गाजण्याचं श्रेय मंदाकिनीला जाऊ लागलं आणि हेच राजीव कपूर यांना पचेनासं झालं. यामुळे ते राज कपूर यांच्यावर नाराज झाले होते. 

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटानंतर राज कपूर यांनी आपल्यासाठी आणखी एखादा मोठा प्रोजेक्ट हाती घ्यावा अशी राजीव कपूर यांची इच्छा होती. पण तसं काही झालं नाही. यामुळे वडिलांबद्दलची नाराजी त्यांच्या मनात दिवसेंदिवस वाढत चालली होती. या नाराजीमुळे राजीव कपूर यांनी 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटानंतर वडिलांसोबत कधीच काम केलं नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai High Court: राज्यात आमदार-खासदारांवर ३९८ खटले, लवकर निकाली काढा; हायकोर्टाचे विशेष न्यायालयांना आदेश

पटेलांनी टोचलेल्या इंजेक्शनचा परिणाम, तब्येतीचं कारण सांगत आणखी एका नेत्यानं पालकमंत्रीपद सोडलं; काय घडलं?

Gmail Safety Tips : तुमचं Gmail हॅक तर झालं नाहीये ना? आत्ताच पाहा नाहीतर होईल खूपच उशीर..सर्व लॉगिन डिवाइस चेक करा एका क्लिकवर

Kolhapur Farmers : मराठवाडा नाही कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना...

AFG vs BAN : अफगाणिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड! वन डे क्रिकेटच्या इतिहासात असा विजय मिळवणारा जगातील एकमेव संघ

SCROLL FOR NEXT