Salman Khan Google
मनोरंजन

Video: भर पत्रकार परिषेदेत सलमान लाजला, कारणही होतं तसंच

सोशल मीडियावर दबंग खानचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

प्रणाली मोरे

सलमान खाननं (Salman Khan) आज वयाची ५५ वर्ष पूर्ण केली असली तरी देखील आजही तो तितकाच रुबाबदार,देखणा दिसतो की त्याच्या प्रेमात कुणीही सहज पडेल. आजपर्यंत तो अविवाहित राहिला असला तरी त्याच्या आयुष्यात अनेक सौंदर्यवती येऊन गेल्या आहेत किंवा आजही आहेत असं म्हटलं नक्कीच चुकीचं ठरणार नाही. अगदी जगत् सुंदरी ऐश्वर्या रायला देखील त्याची भुरळ पडलीच होती नाही का. आता त्या दोघांचं प्रेमप्रकरण काही लपून राहिलेलं नाही. आजही अगदी विशीतल्या पोरीदेखील त्याच्या सहज प्रेमात पडतात. आणि हे सोशल मीडियावर आपण अनेकदा अनुभवतो. किंवा मग एखाद्या कार्यक्रमात त्याच्या एन्ट्रीला उसासा टाकणाऱ्या पोरी दिसतातच की आपल्याला. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय,जो चर्चेत आला आहे.

सलमानचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो आताचा नाही,तर तो आहे त्याच्या 'दबंग' सिनेमाच्या प्रदर्शनावेळेचा. 'दबंग' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होती. पत्रकारांच्या प्रश्नाला सुरुवात झाल्यानंतर एक २४-२५ वर्षाची टि.व्ही न्यूज चॅनलची महिला पत्रकार तडक उभी राहिली. प्रश्न विचारण्याआधी ती सलमानच्या प्रशंसेचा डोलारा उभं करणारं लांबलचक भाषण द्यायला लागली. सलमानने तिला थांबवत मजा-मस्करी करत विषयावर यायला सांगितलं,पण तरीही न थांबता ती म्हणाली,'मला आधी तुला काहीतरी सांगायचंय'. सलमान त्यावर म्हणाला,'सांग' . तेव्हा तिनं भर पत्रकार परिषदेत दबंग खानला सर्वांसमक्ष 'आय लव्ह यू' म्हणत थेट प्रपोजच केलं.

आता घ्या,सेलिब्रिटींच्या प्रत्येक गॉसिपचा खरपूस समाचार घेणारे पत्रकार जेव्हा त्यांच्याच प्रेमात पडतात तेव्हा काय होत असेल. तर तेव्हा सलमान ज्या पद्धतीनं लाजला ना ते लय भारी होतं. त्याच्या शेजारी बसलेली सोनाक्षीही सलमानकडे पाहतच बसली. तर असा आपला दबंग खान कोणालाही नाराज करीत नाही. सध्या सलमानच्या या व्हिडीओवर त्याचे चाहते फिदा आहेत. त्याचं लाजणंही चाहत्यांना खूश करून गेलंय बहुधा. सलमान सध्या बिझी आहे 'टायगर ३' च्या चित्रिकरणात. या स्पाय थ्रीलरची त्याचे सगळेचे चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT