Sara Ali Khan Google
मनोरंजन

आणि सारा अली खान घाबरून पळत सुटली!

असं नेमंक काय घडलं की चालत्या गाडीतनं उतरायची घाई तिनं केली...पहा व्हिडीओ

प्रणाली मोरे

सारा अली खान नेहमीच स्वतःचे वेगवेगळे व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. मग कधी ते जिममध्ये वर्कआऊट करतानाचे असतात तर कधी तिच्या फ्रेंडसोबतचे धम्माल करतानाचे तर कधी तिच्या ट्रॅव्हल स्टोरीज व्हिडीओच्या माध्यमातनं ती शेअर करीत असते. तिचे सारेच व्हिडीओ तिच्या फॅन्सचं मात्र भरभरून मनोरंजन करतात हे ही तितकंच खरंय. पण ब-याचदा तिच्या फॅन्सनेही तिला कॅमे-यात बंदिस्त करीत शूट केलेले व्हिडीओही आपल्याला आनंद देऊन जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओत नेहमीच क्यूट दिसणारी सारा थोडी घाबरलेली दिसतेय. सुरुवातीला ती गाडीत शांत बसली होती. पण अचानक तिला आठवलं की आपला मोबाईल सापडत नाहीय. तेव्हा ड्रायव्हरने गाडी सुरू केली असतानाही घाई-घाईने दरवाजा उघडून ती पळत सुटली. हा प्रसंग जिथे घडला ते होते दिग्दर्शक कबीर खानचे मुंबईतील ऑफिस. तिथे काही खास गेस्ट्ससाठी म्हणे '८३' या सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. सारा ज्या वेगाने पळत गेली ते पाहता उपस्थित मीडिया आणि फॅन्सही थोडे बुचकळ्यात पडले. पण पुढे खुश झाले ते साराचे छान फोटो त्यांना काढता आले यासाठी. सारानेही मग आरामात मीडियाला फोटो काढून दिले. सुरुवातीला मास्क काढण्यासाठी नकार देणा-या साराला मीडियाच्या विनंतीपुढे मात्र झुकावे लागले. शेवटी तिच्या स्वभावात पतौडी खानदानची नात असल्याचा तो गर्व नाही हे खरे आहे ते इथेही प्रत्यक्षात दिसून आले.

साराच्या या व्हिडीओवर खूप मजेदार कमेंट्स आल्या आहेत. कुणी म्हटलंय,'कॉलेजमध्ये पहिल्या लेक्चरला पोहोचण्यासाठी पळतेयस का?' कुणी विचारलंय,'फोन मिळाला का?' तर कुणी काळजीच्या सुरात विचारलं,'काय झालं?' तर एकजण म्हणतोय,'मॅडम माझ्या रीक्षाचे भाडे तर देऊन जा'. छान सी ग्रीन कलरचा पंजाबी ड्रेस घातलेली सारा ट्रेडिशनल लूकमध्ये सुंदर दिसत होती हे मात्र नक्की. सारा अली खान दिग्दर्शक कबीर खानच्या ऑफिसला का आली होती? नक्की '८३' च्या स्क्रीनिंगसाठी की नवीन सिनेमाच्या मीटिंगसाठी?अशी चर्चाही आता सुरू झालीय. सारा आता आगामी 'अतरंगी रे' या सिनेमातनं लवकरच आपल्या भेटीला येतेय. या सिनेमात तिच्यासोबत अक्षयकुमार आणि धुनष दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे बंधुंच्या युतीचा मुहूर्त ठरला? 'या' तारखेला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, राज ठाकरे-संजय राऊतांच्या बैठकीत काय झाली चर्चा?

मुलाला वाचवायला रक्ताचे नमुने बदलले, बाप दीड वर्षांपासून तुरुंगात; पोर्शे अपघात प्रकरणी हायकोर्टानं जामीन फेटाळला

IPL 2026 Auction live : CSK ने स्वतःच्याच खेळाडूला 'परकं' केलं! MS DHONI चा विश्वासू गोलंदाज १८ कोटींत KKR च्या ताफ्यात

Credit Card : या सोप्या सवयी लक्षात ठेवल्या, तर क्रेडिट कार्ड देईल तुम्हाला मोठा फायदा! फायदा हवा? हे एकदा नक्की पाहा!

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

SCROLL FOR NEXT