kangana 
मनोरंजन

तू सतत लोकांशी पंगा का घेतेस? पाहा कंगनाने काय दिलं उत्तर..

स्वाती वेमूल

कंगना आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे. ट्विटरवर दररोज कंगना कोणा ना कोणावर निशाणा साधताना दिसते. आपली मतं बेधडकपणे मांडणाऱ्या कंगनाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कंगनाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस आणि तिच्या आगामी चित्रपटाबद्दल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तिला याविषयी प्रश्न विचारला गेला. "तू सतत लोकांशी पंगा का घेतेस", असा प्रश्न एकाने तिला विचारला असता तिने त्यावर मोकळेपणाने उत्तर दिलं. कंगनाच्याच आगामी 'थलायवी' या चित्रपटातील संवादाचा मजेशीर वापर करत त्या पत्रकाराने तिला प्रश्न विचारला. यावरून कंगनासह उपस्थितांनाही हसू अनावर झालं. 

पत्रकाराच्या प्रश्नावर कंगनाचं उत्तर
"मी लोकांना जे काही बोलते किंवा जे काही मी करते, ते खूपच हलक्या मनाने बोलते आणि करते. पण लोक ते गंभीररित्या घेतात. कारण ती लोकं आयुष्यात तितकेच गंभीर आहेत. त्यामुळे एकानंतर एक गोष्टी घडत जातात आणि वाद वाढत जातो. मी लोकांवर टीका करत असले किंवा माझ्या मनातलं बोलत असले तरी त्यांच्याशी पुन्हा संवाद साधणं माझ्यासाठी खूप सोपं असतं. कारण माझ्या मनात काही कटू भावना नसतात. पण कदाचित लोकांना ते आवडत नाही आणि माझ्यावर जोरदार टीका होऊ लागते. यामुळे मीसुद्धा एक पाऊल मागे घेते. मला असं वाटतं की जर तुमचं मन साफ असेल तर तुम्ही नेहमीच जिंकता," असं कंगना म्हणाली. 

ट्विटर या सोशल मीडिया अकाऊंटवर कंगना बरीच सक्रिय असते. विविध मुद्द्यांवर ती ट्विटरवर व्यक्त होते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा तिला ट्रोल केलं गेलं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता कंगना तिची मतं मांडताना पाहायला मिळते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naxalites Support Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'वोटचोरी'च्या आरोपांना नक्षलवाद्यांचाही पाठिंबा...११ पानी पत्रक जारी करत दिलं समर्थन!

Maharashtra Govt Jobs : भूमिअभिलेख विभागात ९०५ पदांची भरती, राज्य सरकारची मान्यता

Sunday Morning Breakfast : रविवारी ब्रेकफास्टला बनवा कुरकुरीत बीटचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

क्रिकेट द्वंद्व ऐरणीवर

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

SCROLL FOR NEXT