Vishal Nikam Google
मनोरंजन

'बिग बॉस 3'चा विनर विशाल निकम जाणार आर्मीत? सविस्तर वाचा...

'आर्मीमॅन' बनण्याचं त्याचं कैकवर्षापासूनचं स्वप्न लवकरच पूर्ण करणार...

प्रणाली मोरे

'बिग बॉस सिझन 3' चा विजेता म्हणून अखेर विशाल निकमचं(Vishal Nikam) नाव घोषित झालं आहे. १०० दिवसांच्या अथक परिश्रमानंतर विशालनं मोठ्या खिलाडूवृत्तीनं आपलं नाव विजेत्या ट्रॉफीवर कोरलंय. 'बिग बॉस' नं माझा प्रवास आता सुखमय बनवलाय तसंच मला त्या घरानं पुढील आयुष्य जगायला तयार केलंय असंही तो म्हणाला. सांगली जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातनं आलेल्या विशालनं शोच्या सुरुवातीपासूनच आपल्यातला खरा माणूस दाखवायला सुरुवात केली होती. तेव्हा किंवा आताही कोणाला वाटलं असेल हा उगाच साधं वागायचा का प्रयत्न करतोय,तर मी असाच आहे,असं विशालनं ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलंय.

घरातले सदस्य काहीही बोलले तरी विशालला फरक पडत नव्हता कारण खेळ खेळण्यासोबतच त्याला स्वतः मधला खरेपणा गमवायचा नव्हता,जो त्यानं शेवटपर्यंत कायम ठेवलाआणि याच गुणाच्या जोरावर शो चा विनरही बनला. बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आपले पेशन्स वाढवले आहेत असंही त्यानं ईसकाळला दिलेल्या मुलाखतीतनं स्पष्ट केलं. सांगली जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातनं आलेल्या विशालनं शोच्या सुरुवातीपासूनच आपल्यातला खरा माणूस दाखवायला सुरुवात केली होती. तेव्हा किंवा आताही कोणाला वाटलं असेल हा उगाच साधं वागायचा का प्रयत्न करतोय,तर मी असाच आहे,असंही विशाल बाहेर आल्यावर आपल्या मुलाखतींमधनं वारंवार सांगताना दिसतोय.

'ईसकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला,''आता मला माझी एक अधुरी इच्छा पूर्ण करायचीय. मला आर्मीत जायचं होतं. तसं मी स्वप्नही पाहिलं पण काही कारणास्तव जाता आलं नाही. त्यामुळे आता ती इच्छा मला माझ्या कामाच्या माध्यमातनं पूर्ण करायचीय. काम मिळेल पण मला 'आर्मीमॅन'ची भूमिका साकारण्याची मनापासून इच्छा आहे. कोणी जर अशा सिनेमाची मला ऑफर दिली तर मी एका पायावर तयार आहे. त्यानिमित्तानं का होईना आर्मित आता जाता आलं नाही तरी सिनेमातनं आर्मीमॅनची भूमिका साकारून मी मनोमन धन्य होईन. आता विशालचं वय प्रत्यक्ष आर्मीसाठी आवश्यक वयोगटात बसत नसल्यानं आम्ही त्याच्या सिनेमाविषयी बोलत होतो हे लक्षात आलंच असेल आपल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT