will Hrithik marry saba Azad? what bejan daruwalla predicted? Google
मनोरंजन

Hrithik च्या दुसऱ्या लग्नाविषयी काय म्हणालेले ज्योतिषतज्ञ दारुवाला? वाचा

बेजान दारुवाला नेहमीच आपल्या ज्योतिषशास्त्राच्या आधारे बॉलीवूड सेलिब्रिटींबाबतीत भविष्य वर्तवायचे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan)सबा आझादला(Saba Azad) डेट करतोय हे काही आता लपून राहिलेले नाही. अर्थात फायनली आपल्या लाडक्या अभिनेत्याचं घर बसतंय हे जाणून त्याचे चाहते खूशच झाले आहेत. आता सगळे चातकासारखे वाट पाहतायत ते आपल्या लाडक्या कलाकाराच्या दुसऱ्या लग्नाची. पण हृतिक आणि सबा स्वतःच्या नात्यावर ना खुलून बोलताना दिसतायत ना लग्नाची कुठली चिन्ह दिसत आहेत. प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला(Bejan Daruwalla) यांनी हृतिकचा सुझेनसोबत घटस्फोट झाला तेव्हाच एक भविष्यवाणी केली होती ती आता चर्चेत आली आहे. जी ऐकल्यावर हृतिक-सबा लग्न करणार की नाही याचे काहीसे संकेत मिळतील अभिनेत्याच्या चाहत्यांना. चला जाणून घेऊया काय म्हणाले होते बेजान दारुवाला? (will Hrithik marry saba Azad? what bejan daruwalla predicted?)

बेजान दारुवाला नेहमीच आपल्या ज्योतिषशास्त्राच्या आधारे बॉलीवूड सेलिब्रिटींबाबतीत भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसायचे,त्यामुळे त्या सर्कलमध्ये तसे ते जरा जास्तच प्रसिद्ध. अनेकदा त्यांचं ज्योतिष खरं ठरायचं बरं का. ते नंतर गुजरात मध्ये राहायला गेले होते तरिही मुंबईत कामानिमित्तानं,अगदी औषधोपचाराच्या निमित्ताने त्यांचे येणेजाणे चालूच असायचे. पण मुंबईपासून लांब गेल्यावरही गुजरातमध्ये बसून मुंबईतील मायानगरीत राहणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यात आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ते डोकवायचे. हृतिकच्या दुसऱ्या लग्नाविषयी देखील त्यांनी आपलं भविष्य वर्तवलं होतं.

जेव्हा सुझेन आणि हृतिक यांचा घटस्फोट झाला होता तेव्हा बेजान दारुवाला म्हणाले होते,''हृतिक दुसरं लग्न करणार''. अर्थात तेव्हा हृतिक कुठल्याही नात्यात नव्हता. पण आता दारुवाला यांचे भविष्य खरं ठरतंय असं चित्र थोडं स्पष्ट होऊ लागलं आहे. सध्या हृतिक सबा आझादला डेट करतोय. ते दोघे एकमेकांच्या कुटुंबाच्या अधिक जवळ आहेत. दोघेही सध्या लंडनमध्ये आहेत. आणि सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करताना दिसत आहेत.

काही वर्षांपूर्वी हृतिकच्या घटस्फोटाच्या वेळेस बेजान दारुवाला म्हणाले होते,''हृतिक दुसरं लग्न करणार'' असं त्यांचे ज्योतिषशास्त्र म्हणतेय. तेव्हा त्यात फार तथ्य वाटलं नव्हतं. पण आता ज्या पद्धतीनं हृतिक-सबा एकमेकांच्या जवळ आहे,दोन कुटुंबात नातं निर्माण होताना दिसतंय ते पाहून तरी वाटत आहे हृतिक दुसरं लग्न करणार,आणि कदाचित त्याची दुसरी पत्नी सबा आझादच बनणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आला छोटा डॉन

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT