mahindra singh dhoni  file view
मनोरंजन

सूर्यवंशी चित्रपटात दिसणार 'महेंद्रसिंह धोनी'?

धोनी दिसणार सूर्यवंशी चित्रपटात,अशी सगळीकडे चर्चा होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा क्रिकेट विश्वात सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. यावर्षी धोनीच्या कॅप्टनसीमध्येच चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तसेच तो सध्या टी२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून काम करत आहे. तर तो रोहित शेट्टीच्या बहुचर्चित चित्रपट सूर्यवंशीमध्ये चित्रपटात दिसणार आहे , अशी सगळीकडे चर्चा होत आहे.

अनेक हिंदी सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता गुलशन ग्रोव्हर याने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. धोनीसोबतचा फोटो ट्विट करताना गुलशननं लिहिलं,'काय? धोनी सूर्यवंशी चित्रपटात काम करणार? का आम्ही एकाच स्टुडिओत शूट करत आहोत?' पण गुलशनने या फोटो पोस्ट केल्यानंतर याबाबत सर्वांची उत्सुकता वाढली आहे.

सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफची प्रमुख भूमिका आहे. तर आता या दोघांसोबत धोनी स्क्रीन शेअर करणार का? याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच हा फोटो देखील व्हायरल होत आहे. सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ नोव्हेंबरला (गुरुवार) हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफसह यात अजय देवगन आणि रणवीर सिंह यांचीही विशेष भूमिका असून हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT