Samantha, Naga Chaitanya 
मनोरंजन

समंथा-नाग चैतन्य पुन्हा एकत्र येणार? घटस्फोटाची पोस्ट केली डिलिट

समंथाने घटस्फोटाची पोस्ट सोशल मीडियावरून डिलिट केल्याने चर्चांना उधाण

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नाग चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या घटस्फोटाची चर्चा संपूर्ण कलाविश्वात झाली. घटस्फोटाच्या निर्णयाने समंथा-नाग चैतन्यच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र आता या दोघांच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यामागचं कारण म्हणजे, समंथाने तिच्या सोशल मीडियावरून घटस्फोटाबाबतची पोस्ट डिलिट केली आहे. समंथाने २ ऑक्टोबर २०२१ रोजी सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोटाबाबतची माहिती दिली होती. हीच पोस्ट आता तिच्या सोशल मीडियावर दिसत नसल्याने चाहत्यांनी दोघांच्या एकत्र येण्याचा अंदाज बांधला आहे.

पोस्ट डिलिट केल्यानंतर समंथा किंवा नाग चैतन्यने एकत्र येण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी या दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. या लग्नसोहळ्याची चर्चा संपूर्ण कलाविश्वात झाली होती. मात्र या दोघांचा संसार फक्त चार वर्षेच टिकला. घटस्फोटामागील कारण समंथा किंवा नाग चैतन्यने सांगितलं नाही. दुसरीकडे नाग चैतन्यच्या सोशल मीडियावर घटस्फोटाची पोस्ट पहायला मिळतेय.

घटस्फोटानंतर समंथा पहिल्यांदाच एका आयटम साँगमध्ये झळकली. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटातील 'ऊ अंटावा' हे गाणं तिच्यावर चित्रित करण्यात आलं. समंथाच्या संपूर्ण करिअरमधील हा पहिलाच आयटम साँग आहे. ती लवकरच एका आंतरराष्ट्रीय चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. फिलिप जॉन दिग्दर्शित 'द अरेंजमेंट्स ऑफ लव्ह' यामध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. दुसरीकडे नाग चैतन्य हा 'बंगारराजू' या चित्रपटात त्याचे वडील नागार्जुन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'मध्येही त्याची भूमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: महायुती सरकारवर जनतेचा रोष: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; सरकारकडून मदतीच्या नावाखाली तोंडाला पाने पुसण्याचे काम

Hingoli Ashram School Incident : आश्रमशाळेच्या वसतिगृहात अनुचित प्रकार; विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षक निलंबित

Nutritious Diwali Meal: दिवाळीत जेवणाचे ताट सजवा रंगीबेरंगी पोषक पदार्थांनी – आहार तज्ज्ञांचा सल्ला, स्वाद आणि आनंद कायम ठेवा!

MP SET Exam 2025: एमपी सेट 2025 परीक्षेची अधिसूचना जाहीर, जाणून अर्ज कधीपासून सूरू होणार

Festival Travel: दिवाळी आणि छठ पूजेसाठी मुंबई-बनारस 'पूजा विशेष' रेल्वे; प्रवाशांना मोठा दिलासा!

SCROLL FOR NEXT