मनोरंजन

लतादीदींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा....

संतोष भिंगार्डे


मुंबई ः रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण व भावाच्या अतूट नात्याचा सण. आज सगळीकडे रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जात असला तरी लाँकडाऊमुळे  बहीण व भावाची भेट होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनी सोशल मीडियावरून एकमेकाला शुभेच्छा देणे पसंत केले आहे.

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सोशल  मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत लतादीदी आपल्या संदेशात म्हणतात, की नरेंद्र भाई, आज रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी माझा तुम्हाला नमस्कार. आज मी तुम्हाला राखी पाठवू शकत नाही आणि याचे कारण अख्ख्या जगाला माहीत आहे. तुम्ही देशासाठी खूप चांगली कामे केली आहेत. खूप चांगल्या गोष्टी शिकविल्या आहेत. ज्या कुणीच कधी विसरणार नाही. आज देशातील लाखो-करोडो महिला तुम्हाला राखी बांधण्यासठी प्रयत्न करीत असतील. पण ते अशक्य आहे. ते तुम्ही समजू शकता. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशी आम्हाला एक वचन द्या की तुम्ही देशाचं नाव आणखीन मोठे कराल...धन्यवाद.

लतादीदी यांनी व्हिडीओद्वारे हा संदेश पंतप्रधानांना पाठविला आहे आणि या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांचे काही फोटोज् कोलाज केलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लतादीदींच्या या ट्विटला लगेच रिट्विट करून उत्तरही दिले आहे. पंतप्रधान म्हणतात, की लतादीदी, रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी तुम्ही पाठविलेला भावपूर्ण संदेश खूप प्रेरणा आणि उर्जा देणारा आहे. देशातील महिलांच्या आशीर्वादानेच आपला देश यशाचे एकेक शिखर गाठेल आणि नेहमीच यश मिळवील. 

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT